खान्देश

सरकारचा मोठा निर्णय आता प्लॉट NA करण्याची गरज नाही!

सरकारचा मोठा निर्णय आता प्लॉट NA करण्याची गरज नाही!

पाचोरा (प्रतिनिधी) – तुम्हाला आता बांधकाम परवानगी मिळालेल्या प्लॉटला स्वतंत्र येणे करण्याची गरज नसेल आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा जीआर 23 मे 2023 रोजी शासनाकडून काढण्यात आलेला आहे. ज्याच्यामुळे नागरिकांचा घराचे बांधकाम करण्याचा मार्ग सोपा झालेला आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून जमीन महसूल सहिता आहे , 1966 च्या कलम 42 अन्वये शेतीसाठी उपयोगी करत असलेल्या जमिनीचा इतर कोणत्याही वापरासाठी वापर करायचा असेल तर त्या ठिकाणी जमिनीच्या येणे करण्याची गरज आहे . परंतु याच्यामध्ये काही सुधारणा करण्यात आलेले होत्या . ज्याच्यामध्ये कलम 42 अ,ब, क, ड, ड याच्यामध्ये सुधारणा करून गावठाण लगतच्या 200 मीटरच्या अंतरावर जमिनी आहे . अशा जमिनीला NA करण्याची गरज नाही . त्याच्यासाठी एक सनद उपलब्ध करून देण्यात आलेली होती .

तसेच जर का  घराचं बांधकाम करायचे असेल तर त्याच्यासाठी बांधकाम विकसन परवानगी घेणं सुद्धा आवश्यक असतं आणि अशा प्रकारे बांधकाम विकास परवानगी घेणं किंवा या जमिनीसाठी जी सनद उपलब्ध करून घेणे . अशी वेगवेगळे काम करण्यामुळे नागरिकांना घराचे बांधकाम करताना या प्लॉटचा विकास करताना खूप मोठ्या प्रमाणात समस्या येत होत्या . आणि अशाच प्रकारे आता या बांधकाम विकासात परवानगी देण्यासाठी बांधकाम परवानगी व्यवस्थापन प्रणाली अर्थात बीपी एम एस बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टम ऑनलाइन प्रणाली वापरण्यात येत आहे . याच प्रणालीच्या माध्यमातून कार्यपद्धतीचे सुलभिकरण करण्याचे हेतून या परवानगी सोबतच ही सनद देखील देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आलेला आहे! .

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button