एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी !एक जण ताब्यात !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी
पोलिसांकडून एक जण ताब्यात
या कॉलनंतर पोलीस सतर्क झाले. कॉल कुठून आला होता याचं लोकेशन त्यांनी ट्रेस केलं. पोलिसांना मिळालेल्या लोकेशननुसार कॉल पुण्यातील वारजे इथून आला होता. त्यानंतर पोलीस या ठिकाणी पोहोचले आणि एका व्यक्तीला ताब्यात घेतलं.
डायल ११२ काय आहे ?
नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत सर्व मदत एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी, म्हणून 112 हा क्रमांक राज्यात कार्यान्वित करण्यात आला आहे. ‘112’ क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर तो कॉल कुठून करण्यात आला आहे, हे समजते. त्यामुळे संबंधिताला त्वरित मदत देण्याची कार्यवाही केली जाते. पोलीस, अग्निशमन, आरोग्य मदत, महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिक यासारख्या सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळाव्यात, यासाठी केंद्र सरकारने देशभरासाठी ‘112’ हा एकच क्रमांक कार्यान्वित केला. तर महाराष्ट्रात 2021 मध्ये हा क्रमांक कार्यान्वित झाला.
मुख्यमंत्र्यांना जिवे मारण्याच्या यापूर्वी अनेकदा धमक्या आल्या आहेत. नागपूरमध्ये हा कॉल आला असल्याचं समोर आलं आहे. पोलिस याबाबत सखोल तपास करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांना येणाऱ्या धमकीच्या फोन मध्ये मोठी वाढ झाली असून यामुळे पोलिसांसमोर संशयित आरोपींना पकडण्याचे मोठे आव्हान तयार झाले आहे .



