जि.प.उर्दू केंद्रीय मुलांची शाळा जामनेर येथे चित्रकला स्पर्धा

जि.प.उर्दू केंद्रीय मुलांची शाळा जामनेर येथे चित्रकला स्पर्धा
जामनेर प्रतिनिधी इमरान खान
जामनेर प्रतिनिधी: दिनांक ११आगष्ट २०२३ रोजी महाराष्ट्र राज्य बाल चित्रकला स्पर्धा अंतर्गत.जि.प.उर्दू केंद्रीय मुलांची शाळा जामनेर जि जळगाव येथे बाल चित्रकला स्पर्धे चे आयोजन वयो गट ७ वर्षे, वयोगट ७ ते ९ वर्ष, वयोगट ९ ते १२ वर्ष व वयोगट १२ ते १६ वर्षे असे चार गटांवर आधारित गट करून महाराष्ट्र राज्य बाल चित्रकला ने निर्धारित केलेल्या विषयानुसार शाळा स्तरावर चित्रकला स्पर्धे चे आयोजन करण्यात आले. इयत्ता ३ री ते ५ वी पर्यंत ची जबाबदारी शाळेतील जेष्ठ शिक्षिका श्रीमती निलोफर नाज अ.नईम यांनी तर इयत्ता ६ वी ते ७ वी जबाबदारी श्रीमती रजीया पठाण मेडम यांनी स्विकारली शाळेचे मुख्याध्यापक शेख रईस सर यांनी सर्व सामग्री पुरवली तर साबीर खान सर, मुस्तकीम सर, शकील अहमद सर,अजीमुददीन सर, इमरान सर, शाळेतील महिला शिक्षिका श्रीमती नीलोफर नाज अ.नईम व श्रीमती पठाण रजिया बाजी यांनी स्पर्धेच्या आयोजन साठी परिश्रम घेतले या स्पर्धेच्या आयोजनाने शाळेतील बालक व विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. चारही गटातील प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक निवडण्यात आले.



