खान्देश

शेतकऱ्यांसह नागरिकांच्या समस्यांसाठी पाचोरा कॉंग्रेस चा मोर्चा इशारा – काॅंग्रेसचे थेट प्रांताधिकारी यांना निवेदन…

शेतकऱ्यांसह नागरिकांच्या समस्यांसाठी पाचोरा कॉंग्रेस चा मोर्चा इशारा
– काॅंग्रेसचे थेट प्रांताधिकारी यांना निवेदन…
पाचोरा, (प्रतिनिधी)-   शहरातील बाहेरपुरा भागातील रसुल नगर, मच्छीबाजार, कुर्बान नगर, मोची गल्ली या परिसरात नागरिकांना विविध नागरी समस्यांसह शेतकऱ्यांना समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने याबाबत पाचोरा काॅंग्रेसने आक्रमक भूमिका घेत समस्यांचे सुटल्या नाही तर मोर्चा सह आंदोलनाचा इशारा दिला आहे।.

पाचोरा – भडगाव शहरातील व तालुक्यातील जनतेसाठी शेतकऱ्यांच्या समस्या सह पाचोरा कॉंग्रेस गंभीर झाले असून तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली समस्याग्रस्त नागरिकांसह थेट प्रांताधिकारी कार्यालय गाठत प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल यांच्या समोर समस्यांचा पाढा वाचला. निवेदन देते प्रसंगी काॅंग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड. अमजद पठाण, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, ओबीसी तालुका अध्यक्ष इरफान मणियार, महिला जिल्हा प्रतिनिधी अॅड. मनिषा पवार, मौलाना अमजद खान, स्थानिक नागरिक प्रकाश नाथेकर, असलम टकारी, शेख शरीफ शेख मुसा, सलिम खान, युसुफ खान, दिलावर खान, रमेश देसाई, इकबाल मणियार, सईद शेख शबीर, रसुल खान दिलावर खान, हाजी मुजाहीद खाटीक, अकील शेख कलंदर, सलिम खाटीक, ललीता परदेशी, इरफान इमाम, रहुफ टकारी, सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परिसरात प्रामुख्याने नागरिकांची कोणतीही तक्रार नसताना महावितरण कंपनी इलेक्ट्रीक पोल वरुन जे – जे कनेक्शन धारक आहे त्यांचे मीटर हे एका विशिष्ट बाॅक्स मध्ये इलेक्ट्रिक पोलवरच बसविण्याचे नियोजन करत आहे. सदर प्रकारामुळे नागरिकांना मीटर संदर्भात आधीच तांत्रिक दोषांची तक्रार असतांना संबंधित लाईनमन तातडीने येत नाही त्यातच सायंकाळच्या सुमारास इलेक्ट्रीक पोलवर चडत नसुन त्यामुळे अशा अनेक समस्यांना स्थानिक नागरिकांनी सामोरे जावे लागेल यासाठी इलेक्ट्रिक पोलवर मीटर लावण्याची सक्ती करु नये, रसुल नगर मधील गल्ली नं. २ भागातील भुयारी गटारीच्या कामात जो रस्ता काॅंक्रीटचा फोडलेला असुन त्यावर पुन्हा सिमेंटचे काम करण्यासाठी संबंधित ठेकेदाराला कामाचे पैसे मिळाले असुन देखील संबंधित ठेकेदाराने सदरचे सिमेंटचे काम केलेले नसुन चेंबर देखील बनविलेले नाहीत. आणि भुयारी गटारीचे कनेक्शन देखील जोडलेले नाही. तसेच हिंदू स्मशान भुमी च्या लगत नगर परिषद च्या खुल्या जागेत प्लॅव्हर ब्लॉग बसवून अंत्ययात्रेसाठी येणाऱ्यांसाठी पार्किंग साठी उपलब्ध करून देण्यात यावी येणाऱ्या पावसाळ्यामध्ये स्थानिकांना सामना करावा लागेल, पाचोरा रेशन पुरवठा विभागातील मागील काळात जो शिंगाडा मोर्चा काढण्यात आला होता त्यातील लाभार्थ्यांना अद्यापही धान्य पुरवठा लेखी आश्वासन देखील देऊनही झालेला नाही. यासोबतच आॅक्टोबर – २०२२ ते मार्च – २०२३ पर्यंत फ्री धान्य आणि विकत धान्य याची तात्काळ चौकशी व्हावी, तसेच पाचोरा – भडगाव तालुक्यातील उष्णता तापमान मापक हे कार्यान्वित नसुन या भागात तीव्र उष्णतेमुळे केळीसह फळ बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असतांना देखील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना त्याचा लाभ घेता आलेला नसुन पाचोरा – भडगाव तालुक्यातील महसूल मंडळ येथील उष्णता तापमान मापक कार्यान्वित करण्यात यावे. कपाशी बहुतांशी घरात पडली आहे तसा शासकीय खरेदीसाठी तात्काळ अहवाल शासनाकडे पाठवावा अशा मागण्यांचे निवेदन पाचोरा काॅंग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी यांना देण्यात आले आहे. सदरच्या वरील समस्यांबाबत तातडीने आपल्या स्तरावरुन संबंधित विभाग प्रमुखांना आदेश देण्यात यावे. अन्यथा सनदशीर मार्गाने १२ जुन पासुन आंदोलन करावे लागणार असल्याचा इशारा देखील या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button