खान्देश

पाचोरा येथे गावठी पिस्तुल बाळगणा-या एकास अटक !

पाचोरा येथे गावठी पिस्तुल बाळगणा-या एकास अटक !

पाचोरा, 20 सप्टेंबर: गणेश उत्सवाच्या पुर्व संध्येला पाचोरा शहरात सर्वत्र खरेदीची वर्दळ सुरु असताना शहरा पासून 2 किमी अंतरावर जिवंत काडतुसे व पिस्तुल बाळगणारा तरुण पाचोरा पोलिसांच्या सापळ्यात अडकल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गौरव राजेंद्र पाटील (वय- 26 रा. गोराडखेडा ता. पाचोरा ) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?.

पाचोरा तालुक्यातील गोटाडखेडा येथे दर्ज्या जवळ एक तरुण गुप्त सुत्रांकडून पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस कॉन्स्टेबल . कॉ. योगेश पाटील यांनी तात्काळ पोलिस निरीक्षक राहुल खताळ उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, पो. कॉ. योगेश पाटील, राहुल बेहरे, बेलदार यांचे पथक तयार करुन घटना स्थळाकडे रवाना केले.

कमरेला पिस्तुल लावुन फिरत असल्याची माहिती योगेश पाटील यांना मिळाली होती. सदरची माहिती पोयांना दिल्याने त्यांनी लगेचच पोलिस विश्वास देशमुख, प्रकाश शिवदे, संदिप भोई, विनोद बेलदार , पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे यांनी साध्या गणवेशात सापळा रचून संशयीत गौरव राजेंद्र पाटील याला पिस्तुल व जिवंत काडतुस सह शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडून 25 हजार रुपये किंमतीची पिस्टल व 5 जिवंत काडतुसे तसेच त्याच्या ताब्यातील 40 हजार रुपये किंमतीची मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, सदर आरोपीवर गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे हे करीत आहे. दरम्यान, पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे पुढील होणारा अनर्थ टळल्याने पाचोटा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या सह तपास पथकाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button