कृषी

भडगांव तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा. शेतकरी संघटनेची मागणी

भडगांव तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा. शेतकरी संघटनांची मागणी
भडगाव (प्रतिनिधी) – मागच्या एक महिन्या पेक्षा जास्त कालावधीपासून भडगाव तालुक्यात पावसाने दडी मारली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेली पिके जळून गेली आहेत. पावसाअभावी तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला आहेत.शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करुन, शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी संघटना, शेतकरी संघर्ष संघटना,बी.आर. एस अश्या विविध संघटनांच्या तालुका अध्यक्षांनी एकत्र येऊन तहसीलदारांना निवेदन देऊन केली आहे.
शेतमालाला रास्त भाव मिळत नाही,मागील वर्षीचा कापूस अजून शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. त्यात दुष्काळाचे अस्मानी संकट अश्याने शेतकरी कसा जगेल ? बँकांचे पिक कर्ज कसे फेडायचे असे अनेक प्रश्न शेतकऱ्या पुढे आहेत.त्या साठीच
१)तालुक्यांत दुष्काळ जाहीर करावा,
२)शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी.
३)तालुक्यात चारा छावण्या सुरु कराव्यात.
४) पिक विमा मंजूर करावा
अश्या मागण्या विविध शेतकरी संघटनांनी एकत्र येत केल्या आहेत.
यावेळी नायब तहसिलदार रमेश देवकर यांना निवेदन देताना शेतकरी संघटना अध्यक्ष अखिलेश पाटील, शेतकरी संघर्ष संघटना अध्यक्ष विजय साळुंके, बी.आर. एस चे अध्यक्ष सतीश पाटील, सरदारसिंग पाटील, मंगीलाल मांडोळे, शिवाजी पाटील यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button