खान्देश

तात्यासाहेब आर. ओ.पाटील विज्ञान,वाणिज्य व कला कनिष्ठ महाविद्यालयाचा 100% निकालाची परंपरा कायम…..!

तात्यासाहेब आर. ओ.पाटील विज्ञान,वाणिज्य व कला कनिष्ठ महाविद्यालयाचा 100% निकालाची परंपरा कायम…..!
पाचोरा- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या इ.12 वीच्या परीक्षेत तात्यासाहेब आर. ओ.पाटील विज्ञान,वाणिज्य व कला कनिष्ठ महाविद्यालयाचे 19 विद्यार्थी प्रविष्ठ होते.सर्वच विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून देदीप्यमान यश संपादन केले आहे. कु.क्रिष्णा ईश्वर देशमुख याने 87.67% गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम, *कु.खुशी प्रकाश राठोड हिने 83.83% गुण मिळवून द्वितीय तर कु.अथर्व प्रशांत पाटील याने 83.50% तृतीय क्रमांक पटकावला आहे.
या उत्तुंग यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा सौ. वैशाली सुर्यवंशी, सचिव श्री नरेंद्रसिंग सुर्यवंशी, शालेय शिक्षण संचालक डॉ. भगवान सावंत, प्राचार्य श्री. प्रदीप सोनवणे, यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

 

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button