आदिवासी तडवी भिल जमातीचे रहनुमा अँड.याकुब तडवी नागपुर येथे सन्मानित!

आदिवासी तडवी भिल जमातीचे रहनुमा अँड.याकुब तडवी नागपुर येथे सन्मानित
आज दि. 5 मे शुक्रवार रोजी नागपुर येथे होणार्या “आफ्रोट चेंबर” चे उद्धघाटन प्रसंगी केद्रीयमंत्री मा. नितिन गडकरी यांच्या हस्ते आदिवासी मंत्री गावीत साहेबांच्या उपस्थीतीत जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच एॆड. याकुब सरांचा सन्मान करण्यासाठी मरसकोल्हे साहेबांच्या हस्ते व महाराष्ट्रातील अफ्रोट टीम चे एॆड. याकुब सरांचा सन्मान ही आपल्या जमातीसाठी अभिमानाची बाब आहे. एॆड.याकुब सर आपले अभिनंदन व पुढील वाटचालिच्या हार्दीक हार्दीक शुभेच्छा..
आदिवासी तडवी भिल जमातीचे नाव उज्ज्वल करणार्या,अँड.याकुब साहेबु तडवी यांच्या जिवनाबद्दल थोडेसे जाणुन घेऊया.
आदिवासी तडवी भिल समाजातील एक सुप्रसिद्ध वकिल,कायदेपंडित, शिक्षणतज्ञ तसेच एक राजकारणी,समाजकारण, समाजसेवा क्षेत्रातील मुरब्बी व्यक्तिमत्त्व.तडवी भिल समाजाचा लेखाजोखा असलेले एक इतिहासकार.
एॆड.याकुब साहेबू तडवी यांचा जन्म खिरोदा ता.रावेर येथे इ.स. २६डिसेंबर १९६८ रोजी वाधे कुलवंशात झाला. आपल्या शैक्षणीक जिवनापासुनच त्यांना समाजसेवेची आवड होती.तडवी भिल समाजाच्या उत्थानासाठी गेल्या ३०/३५वर्षांपासुन सामाजिक कार्यात त्यांनी स्वत:ला वाहुन घेतले. तडवी भिल समाजासाठी संघर्ष करुन समाजाच्या भल्यासाठी अनेक सामाजिक व्यक्तींनी स्वत:ला झोकुन दिले. त्या पहील्या फळीतील व्यक्तींपासुन म्हणजेच मरहुम रौनक ,मरहुम रमजान सरदार,अरमान जमादार पासुन ते त्यांचे मित्र जफरुल्ला (संजू)जमादार, डाॆ तल्यारखा तडवी,डी.बी.तडवी,एम.बी.सर, कामील नामदार ,रुबाब साहेब पाल.तसेच रुबाब साहेब इरावल बरोबरच आमद बुर्हाण,मुनाफ जुम्मा,राजु बिर्हाम,दिलरुबाब तडवी,राजू अमिर ,मंसुर तडवी मोहरद इत्यादी यांच्या व आणखी असे सहकारी मित्रांच्या बरोबरीने याकुब साहेबांनी समाजसेवा क्षेत्रात आपले योगदान दिले. तसेच त्यानंतरच्या काळातील सहकारी वर्ग व आज ज्यांनी सामाजिक सेवेचे व्रत हाती घेतलेले आहे असे तडवी भिल समाजातील नवयुवकांची आजची फळी.अशा तीनही फळीतील सामाजिक कार्य करणार्या व्यक्तींबरोबर अँड याकुब साहेबांचे सामाजिक कार्य नेटाने अविरतपणे सुरु आहे.
सामाजिक शैक्षणिक तसेच व्यवसायिक क्षेत्रात तडवी समाजाचा विकास व्हावा म्हणुन लोहारा येथे आय टी आय ची स्थापना केली.काही कारणास्तव बंद आहे.सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी स्पर्धा परिक्षांसारख्या परिक्षांमध्ये तग धरावा म्हणुन अनेक ठिकाणी मार्गदर्शन शिबीर आयोजित केले गेले.आरोग्य विषयक शिबीर व त्यातुन जनजाग्रुतीचे कार्य केले. तसेच समाजातील गरिब पिडितांना योग्य तो मदतीचा हात देणारे….
चुलखान सारख्या ठिकाणी व अन्य ठिकाणी तडवी समाजावर कोठेही नैसर्गिक आपत्ती ओढवली तर धावुन जाणारे…. व यथायोग्य मदत पुरवण्याकामी सतत पुढे असणारे…..अशा अनेक ठिकाणी याकुब साहेबांचा सिंहाचा वाटा असतो. तडवी भिल समाजाच्या रुग्णांसाठी म्हणजेच लाईफ लाईन अँब्युलंन्ससाठी ७७७७७+२२२२३ रुपयांची अशी भरघोस मदत देणारे दिलदार मनाचे व्यक्तीमत्त्व म्हणजेच एॆड.याकुब तडवी वकिल होत.
समाजाचा सांस्क्रुतिक विकास व्हावा व कला क्षेत्रात आपल्या युवापिढीने आपली कला जगासमोर दाखवावी म्हणुन “कला क्रिडा व सांस्क्रुतीक मंडळाची स्थापना केली”. तडवी भिल समाजातील पहीला लघुचित्रपट “मेहनतचा मिठ्ठाफय” साठी त्यांनी खुप प्रयत्न केले. धर्माचे पालन करतांना जकात चे मुल्य फक्त आपली तडवी भिल समाजासाठीच देण्याची संकल्पना त्यांनी रुजविली. रमजान महीण्यात आपल्या गरिब समाजालाच त्यांनी ध्यानात घेतले. “जकात,फित्रा,व खैरात सारखे इस्लामी तत्व फक्त तडवी भिल समाजापुरतेच वापरण्यात यावेत,अशा सुंदर विचारांना त्यांनी जन्म दिला.,आपला समाज खुप गरिब समाज आहे. जकातचा पैसा गरीबालाच मिळाला पाहीजे” या त्यांच्या विचारांतुन समाजाला एक प्रेरणादायी दिशा मिळाली. साहेबे निसाब असणार्या तडवी भिल बांधवांनी आपल्या गरिब समाजातच जकात वाटायला हवी. हे विचार साहेबांचेच, आज खुप लाखमोलाचे ठरतात…ख्वाजा बंदे नवाज रहमतुल्लाहे वअलैही गुलबर्गा शरीफ,हजरत निजामुद्दीन औलिया दिल्ली, हजरत ख्वाजा मोईनुनुद्दीन चिश्चि रहमतुल्लाहे अजमेर शरीफ अशा अनेक सुफी दर्ग्यांवरील जियारत करुन मनाची पवित्रता आबाधीत ठेवणारे एक पाकसाफ विचारांचे सुफीवादी रहनुमा व्यक्तीमत्त्व म्हणजेच एॆड. याकुब तडवी यांचा उल्लेख करावासा वाटतो!!
तडवी समाजाचे राजकारणातील महत्त्व काय आहे…!?आणि तडवी समाज राजकारणाची दिशा कशी बदलवु शकतो!. हे याकुब साहेबांनी १९९६साली विधानसभेच्या निवडणूकीत दाखवुन दिले होते.२०१९या वर्षी त्यांनी चोपडा ग्रामिण मतदार संघातुन विधानसभेची निवडणुक लढविली. तडवी भिल समाजाची राजकारणातील मक्तेदारी टिकवण्यासाठी त्यांनी ही निवडणुक लढविली.योग्य रणनिती, वैचारिक तालमेल सामाजिक मंथन राजकिय परिपक्वता व अभ्यासपुर्ण माहीतीच्या तसेच तडवी समाजाच्या आपलेपणाच्या बळावर विधानसभेची निवडणुक लढले त्यात ते हारले, पण त्यांनी आपले तडवी भिल समाजाचे अस्तित्व दाखवुन दिले. हारले पण त्यात ते जिंकले.”काही पराभव हे विजयापेक्षाही श्रेष्ठ ठरतात.” याकुब साहेबांच्या बाबतीत हेच खरे ठरले
उच्च विचारसरणी उच्च राहणीमान,साधा स्वभाव, तिक्ष्ण बुद्धीमत्ता,आपल्या कामातील सातत्यपणा. मनमिळाुपणा समाजाचा जाणदार वक्ता, एक समाज हितचिंतक. समाजाच्या प्रत्येक समस्यांशी निगडीत त्या दुष्टीकोणातुन अहोरात्र काम करणारा अशा या तडवी समाजातील महानायकाला माझा सलाम
*गरिब,पिडित,आजारी लोकांसाठी आस्थेवाईकपणे विचारपुस करुन मदतीचा हात देणारे एॆड याकुब साहेबांचे समाजावरील प्रेम व त्याग्य भावना दिसुन येते.तडवी समाजात कोठेही कार्यक्रम असो,सोहळा असो त्या ठिकाणी काहीना काही त्यात त्यांचा हातभार असतोच असतो. “आदिवासी तडवी भिल समाज रत्नागिरी” आयोजित कोकण विभागीय आयोजित स्नेहमेळावा(गेटटुगेदर) संपन्न झाला २०१९ तसेच फेब्रुवारी 2023 मध्ये त्यात सहभागी परिवारांचा यथायोग्य सत्कार म्हणुन एॆड.याकुब साहेबांनी सन्मान चिन्ह (शिल्ड) देऊन सत्कार केला. यात त्यांच्या ह्रुदयात समाजाविषयी आदर किती आहे हे दिसुन आले.!! “सामाजिक हब” निर्मित तडवी समाजाचा कॆलेंडरसाठी यथायोग्य मदत करणारे. समाजातील लेखकांना,कविंना नेहमीच प्रोत्साहन देवुन आर्थिक सहकार्य करणारे. या त्यांच्या दानशुरपणातुन समाजाबद्दलचा त्यांचा बघण्याचा द्रुष्टीकोण व त्यातुन त्यांची समाजाबद्दलची आपुलकी प्रेम,जिव्हाळा दिसुन येतो.याकुब साहेबांसारखे व्यक्तीमत्त्व तडवी भिल समाजाला लाभणे म्हणजे समाजाचे महाभाग्यच…!! म्हणुन याकुब साहेबां विषयी एक शायरी लिहावीशी वाटते…..*.
शिक्षण,व्यवसायिकता,आरोग्य,राजकारण,समाजसेवा,आपत्ती व्यवस्थापन, धर्म,संस्क्रुती,राहणीमान या आणि अशा अनेक आघाड्यांवर आपले कार्य चोखपणे समाजहीतासाठी करणारे तसेच तडवी भिल्ल समाजासाठी अनेक समस्यांबाबतीत परिवर्तन घडवु पाहाणार्या समाजातील या विचारवंताला व समाजसेवकाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे



