खान्देश

भडगाव येथे कॉलनी भागात डेंगू निर्मूलन साठी प्रहार जनशक्ती पार्टीचे जिल्हा अध्यक्ष विजय भोसले यांनी केली मोफत फवारणी !

भडगाव येथे कॉलनी भागात डेंगू निर्मूलन साठी प्रहार जनशक्ती पार्टीचे जिल्हा अध्यक्ष विजय भोसले यांनी केली मोफत फवारणी !

भडगाव, 23 ऑक्टोबर 2023: भडगाव शहरातील कॉलनी भागात डेंगू निर्मूलनासाठी सामाजिक कार्यकर्ते विजय भोसले यांनी मोफत फवारणी केली.

यावेळी प्रहार जनशक्ती पार्टीचे जिल्हा अध्यक्ष विजय भोसले म्हणाले की, “भडगाव शहरात डेंगूची साथ वाढण्याची शक्यता आहे. या साथीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राखण्यासाठी मी ही फवारणी केली आहे.

या फवारणीमध्ये जयहिंद कॉलनी, किसान कॉलनी, उज्ज्वल कॉलनी, शिवशक्ती कॉलनी, गुरुदत्त कॉलनी, पोलिस लाईन, एच कॉलनी, साकेत कॉलनी, शेजवलकर नगर, शिवाजी नगर आणि जिजामाता कॉलनी यांचा समावेश होता.

विजय भोसले यांनी नागरिकांना आवाहन केले की, “आपण सर्वांनी आपल्या घराभोवती आणि परिसरात स्वच्छता राखावी. पाण्याचा साठा झाकून ठेवावा. डासांना आकर्षित करणाऱ्या वस्तू घराबाहेर ठेवू नयेत. झोपताना मच्छरदानीचा वापर करावा. डास प्रतिबंधक औषधांचा वापर करावा.”

या फवारणीत विजय भोसले यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि स्वयंसेवक सहभागी झाले होते.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button