खान्देश

पाचोऱ्यात मार्केट कमिटीवर सेनेच्या शिंदे गटाचा झेंडा आमदार किशोर पाटील यांना बहुमत कि ,काठावर पास ! तर महाविकास आघाडी नंबर दोनला !

पाचोऱ्यात मार्केट कमिटीवर शिंदे गटाचा झेंडा आमदार किशोर पाटील यांना बहुमत कि काठावर पास ! तर महाविकास आघाडी नंबर दोनला ! तर अमोल शिंदें च्या दोन जागेचे महत्व ही वाढले! 

सभापती आमचाच होणार –  आमदार किशोर पाटील 

पाचोरा (योगेश पाटील )- आज रोजी निकाल लागलेल्या परंतू दिड ते दोन वर्ष लांबणीवर पडलेल्या बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीसाठी  शुक्रवार २८ रोजी जळगाव जिल्ह्यात सर्व मतदान केंद्रांवर नेहमीप्रमाणे शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. काल पहिल्या टप्प्यात ६ कृषी उत्पन्न बाजार समितीचे निकाल जाहीर देखील झाले  असून आज दुसऱ्या टप्प्यात उर्वरित ६ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचे निकाल घोषित झाले . प्रचारादरम्यान राजकीय नेत्यांच्या जीभ घसरल्या तर काहींनी एकमेकांना आयुर्भावात आरोप प्रत्यारोप केले. यामुळे निवडणुकी पूर्वी निवडणुकीचा आखाडा चांगलाच गाजला होता तर निवडणुकीत आर्थिक देवान घेवाण चे बलाबल देखील झाले. या दोन दिवसांच्या घडामोडी नंतर आज पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी भडगाव रोड वरील रामदेव लोंस याठिकाणी करण्यात आली होती . मतमोजणी सकाळी सुरवात होऊन दुपारी साधारणता ३ वाजेपर्यंत निकालाचे स्वरूप स्पष्ट झाले होते यात  आमदार किशोर पाटील यांनी पुनः नेतृत्व सिद्ध केले. कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक चांगलीच चुरशीची झाली असून यात एकनाथ शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या शेतकरी विकास पॅनलने १८ पैकी नऊ जागांवर विजय मिळवत वर्चस्व सिद्ध केल आहे.

तर दुसरीकडे माजी आमदार दिलीप वाघ व वैशाली सूर्यवंशी , सचिन सोमवंशी ,यांच्या महाविकास आघाडीला सात जागा मिळाल्याने व  अमोल शिंदे यांच्या भाजप पुरस्कृत शेतकरी सहकारी पॅनलच्या विजयी झालेल्या दोन उमेदवारांचं महत्त्व वाढलं आहे. त्यामुळे आता बहुमताचा १० चा आकडा कोण गाठणार कोण आपला सभापती खुर्चीवर बसविणार  हे पाहावं लागणार आहे.

तसेच  आमदार किशोर पाटील यांच्या भगिनी ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी पाचोर्‍यात उद्धव ठाकरेंची सभा घेतली होती. त्यानंतर पहिल्यांदाच बाजार समिती निवडणुकीला सामोरे जावून . वैशाली सूर्यवंशी यांनी किशोर पाटील यांच्या पॅनलच्या विरोधात मा आमदार दिलीप वाघ यांच्या सोबत महाविकास आघाडीच्या माध्यमातून सात जागा निवडून आणल्या आहेत.  याच्यात म्हणाता येईल आमदारकी प्रमाणेच आताही आमदार किशोर पाटील काठावर पास होऊनही सभापती आपलाच असणार हे प्रसार माध्यमांना सांगत आहे .

यापुढे मात्र या सत्ता संघर्षा नंतर सर्वसामन्य जनतेचे व शेतकरी बांधवांचे लक्ष राहील ते कोण जागा विकतो व कोण विकू देतो. याकडे !

पाचोरा बाजार समितीत शिंदे गट शिवसेना भाजप विरुद्ध महाविकास आघाडी विरुद्धअमोल शिंदे (भाजप) अशी तिरंगी लढत होती. यात शिंदे शिवसेना गटास  ९ जागा, महाविकास आघाडीला ७ जागा तर अमोल शिंदे (भाजप) यांना २ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

पाचोरा बाजार समितीवर आमदार किशोर पाटील यांच्या शेतकरी विकास पॅनलने १८ पैकी नऊ जागांवर विजय मिळवत वर्चस्व सिद्ध केल आहे. या ठिकाणी आमदार किशोर पाटील यांनी त्यांच्या विरोधात बहीण तथा महाविकास आघाडीतील ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी आव्हान दिल होतं. त्यांच्या पॅनेलनं ७ जागांवर विजय मिळवला राजकारणातील पहिले पाऊल यशस्वी झाले असे म्हणता येईल.

अशी आहे पक्षीय बलाबल

पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक निकाल

एकूण 18 जागा

शिवसेना (शिंदे गट) – 09
महाविकास आघाडी – 7
भाजप – 02   याप्रमाणे तिन्ही गटास मिळालेल्या जागा आहेत . 

निवडून आलेल्या सर्व संचालकांचे न्यूज झेप इंडिया परिवाराकडून हार्दिक  अभिनंदन व शुभेच्छा !

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button