क्राईमखान्देश

पाचोरा पोलीस स्टेशनला मिळाले नवे नेतृत्व: कर्तव्यदक्ष राहुलकुमार पवार निरीक्षकपदी रुजू ! 

पाचोरा पोलीस स्टेशनला मिळाले नवे नेतृत्व: कर्तव्यदक्ष राहुलकुमार पवार निरीक्षकपदी रुजू ! 

पाचोरा, दि. ०६ जुलै २०२५: पाचोरा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकपदी कर्तव्यदक्ष आणि अनुभवी अधिकारी म्हणून ओळखले जाणारे श्री. राहुलकुमार पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ते चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे यशस्वी कार्यकाळ पूर्ण करून आले आहेत. त्यांच्या नियुक्तीने पाचोरा शहरातील आणि तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेला अधिक बळकटी मिळेल, अवैध धंदे, सट्टा, पत्ता, जुगार, अवैध दारू विक्री, गुटखा विक्री, चक्री, यांना पोलिस प्रशासनाचा आशीर्वाद लाभणार नाही अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. स्थानिक पत्रकार , सामाजिक कार्यकर्ते  यांनी राहुलकुमार पवार यांचे स्वागत केले असून, त्यांच्या नेतृत्वात पोलीस दलाच्या कामात अधिक गती येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

कर्तृत्वाचा ठसा उमटवणारा प्रवास : 

श्री. राहुलकुमार पवार हे २००६ मध्ये वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी पोलीस दलात दाखल झाले. आपल्या आतापर्यंतच्या सेवाकाळात त्यांनी अनेक आव्हानात्मक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्यांनी अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेत (LCB) काम करताना अनेक गुंतागुंतीच्या गुन्ह्यांची उकल केली. तसेच, विशेष तपास पथकातही (SID) त्यांनी आपल्या कौशल्याची छाप पाडली. धुळे जिल्ह्यातही विविध पदांवर काम करताना त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.

उच्चशिक्षित आणि अभ्यासू अधिकारी

नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील मूळ रहिवासी असलेले श्री. पवार हे उच्चशिक्षित अधिकारी आहेत. त्यांनी कृषी क्षेत्रात एम.एस्सी. (M.Sc. Agri) पदवी प्राप्त केली आहे. शिक्षण आणि अनुभवाची सांगड घालत त्यांनी पोलीस दलात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

नवनियुक्त पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्यासमोर पाचोरा शहरातील वाहतूक समस्या, गुन्हेगारी नियंत्रण आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे प्रमुख आव्हान असणार आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि कार्यक्षमतेचा फायदा पाचोरा पोलीस दलाला निश्चितपणे होईल आणि पोलीस-नागरिक संबंध अधिक दृढ होतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा पोलीस स्टेशनच्या कामकाजात अधिक सकारात्मक बदल दिसून येतील, असा विश्वास नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

 

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button