खान्देश

पाचोरा येथील पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी श्री विनोद शिंदे यांची ए. एस. आय. पदावरून प्रमोशन होऊन पी.एस.आय. पदी ठाणे येथे बदली

*पाचोरा येथील पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी श्री विनोद शिंदे यांची ए. एस. आय. पदावरून प्रमोशन होऊन पी.एस.आय. पदी ठाणे येथे बदली! 

झाल्याबद्दल त्यांचा पाचोरा पोलीस स्टेशन तर्फे पोलीस निरीक्षक श्री राहुल खताळ साहेब यांच्याकडून निरोप समारंभ व सत्कार*
पाचोरा प्रतिनिधी:- अनिल (आबा) येवले पाचोरा येथील पोलीस स्टेशनला गेल्या दोन वर्षापासून कार्यरत असलेले ए. एस. आय. पदी असलेले पोलीस कर्मचारी श्री विनोद शिंदे यांनी जळगाव जिल्ह्यात अनेक पोलीस स्टेशन केले असून त्यामध्ये त्यांनी एम.आय.डी.सी. जिल्हा पेठ जळगाव जळगाव शहर रामानंदनगर पोलीस स्टेशन पारोळा त्यानंतर पाचोरा येथे दोन वर्षापासून कार्यरत असून त्यांनी अनेक गुन्ह्यांचा तपास केला व त्यांच्या गुन्ह्यात काहींना सजा ही झाली आहे श्री विनोद शिंदे यांनी सन – 2013 यावर्षी पीएसआय पदाची परीक्षा दिली. त्यांची पी.एस.आय. पदी त्यांची निवड झाली होती. 2013 ला महाराष्ट्रातून 385 पोलीस पी.एस.आय. पदी पास झाले होते. त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातून नऊ जण यामध्ये होते त्यामध्ये पाचोर्‍यातून श्री विनोद शिंदे हेही पास झाले होते. नुकत्याच शासनाने या पी.एस.आय. पदी पास झालेले श्री विनोद शिंदे यांची ए. एस. आय. वरून पीएसआय पदी प्रमोशन होऊन त्यांची बदली नुकतीच ठाणे येथे झाली असून त्यांच्या या बदली निमित्त पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री राहुल खताळ  यांनी त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी पाचोरा पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. पोलीस कर्मचारी यांनीही त्यांचा सत्कार करून त्यांना निरोप दिला यावेळी श्री. विनोद शिंदे यांनी आपल्या मनोगत मध्ये व्यक्त केले की, मला पाचोरा शहराची शेवटपर्यंत आठवण राहील मला पाचोरा पोलीस स्टेशन कर्मचारी व तसेच शहरातील नागरिकांनी दिलेले प्रेम याची मला सदैव कायमस्वरूपी आठवण राहील.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button