खान्देश

पाचोरा पोलीस निरीक्षकांची तात्काळ बदली करा, भाजप युवा मोर्चाची मागणी…

पाचोरा पोलीस निरीक्षकांची तात्काळ बदली करा, भाजप युवा मोर्चाची मागणी!

प्रतिनिधी – पाचोरा पोलीस स्थानकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देत पोलीस स्थानकातून हाकलून लावण्याचा प्रकार घडला असून याची गंभीर दखल घेऊन पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची जळगाव पोलीस मुख्यालय बदली करावी, अशी मागणी भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी धनंजय येरुळे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा पोलीस स्थानकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. अशोक पवार हे गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या पोलिस ठाणे हद्दीत राजकीय पक्षपाती धोरणाने काम करीत असल्याचा आरोप भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. सामाजिक वादविवाद व किरकोळ भांडण प्रकरणी भाजप पदाधिकारी समन्वय साधण्याचा प्रयत्न करत असताना अनेकदा पोलीस निरीक्षकांकडून अपमानास्पद वागणूक देत त्यांना पोलीस स्थानकातून हाकलून लावण्याचे प्रकार समोर आले आहे.
त्यामुळे भाजप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पाचोरा पोलीस स्थानकात सन्मानाची वागणूक मिळावी, पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्यासह त्यांच्या प्रभावाखाली काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची जिल्हा मुख्यालय बदली करावी अशी मागणी उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तरी या निवेदनाची तात्काळ दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा भाजप युवा मोर्चातर्फे देण्यात आला आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button