*सौ. सिंधुताई पंडीतराव शिंदे प्राथमिक शाळेत आषाढी एकादशी उत्साहात साजरी; पालखी सोहळ्याने भाविक वातावरण*

*सौ. सिंधुताई पंडीतराव शिंदे प्राथमिक शाळेत आषाढी एकादशी उत्साहात साजरी; पालखी सोहळ्याने भाविक वातावरण*
*पाचोरा | प्रतिनिधी*
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त पाचोरा येथील *सौ. सिंधुताई पंडीतराव शिंदे प्राथमिक शाळेत* भक्तिमय वातावरणात पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाचा पारंपरिक वेश परिधान करून टाळ, मृदंग आणि वीणेच्या गजरात अभंग, भजन तसेच हरिनामाचा गजर करीत दिंडीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष *पंडीतराव परशराम शिंदे, संस्थेचे संचालक **सतीश परशराम शिंदे, भाजपाचे युवा नेते * अमोल पंडीतराव शिंदे, गोराडखेडा केंद्राचे केंद्रप्रमुख **राजेश सोनवणे* तसेच शाळेचे मुख्याध्यापक समाधान माधवराव महाजन* यांच्या हस्ते भगवान विठ्ठल-रुक्मिणी यांच्या मूर्तीचे व पालखीचे पूजन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्यातून *पर्यावरण संरक्षण, स्वच्छता आणि सामाजिक जबाबदारी* यांचा प्रभावी संदेश देत उपस्थितांमध्ये जनजागृती केली. विद्यार्थ्यांच्या अभिनयाला आणि वारकरी परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या दिंडीला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वारकरी परंपरा, संत संस्कृती, भक्ती, संस्कार आणि सामाजिक मूल्यांची ओळख झाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी विशेष परिश्रम घेतले.



