क्राईमखान्देश

पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला; शाळकरी मुलीचा विनयभंग करणाऱ्या बसचालकावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला; शाळकरी मुलीचा विनयभंग करणाऱ्या बसचालकावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

 

पिंपळगाव हरेश्वर, पाचोरा: पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेंदुर्णी येथील एका खासगी शाळेच्या बसचालकावर अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे. पोलिसांच्या या सतर्कतेमुळे पुढील मोठा अनर्थ टळला आहे.

या घटनेतील आरोपी, अबिद हुसेन शेख (वय ४१, रा. शेंदुर्णी), हा एका खासगी शाळेच्या बसवर चालक म्हणून काम करतो. मिळालेल्या माहितीनुसार, तो स्कूलबसमध्ये ये-जा करणाऱ्या लहान मुलींशी गैरवर्तन करत होता. तो मुलींकडे वाईट नजरेने पाहणे, जवळीक साधणे, मुद्दामहून नको त्या ठिकाणी स्पर्श करणे आणि “तू मला खूप आवडतेस” अशा अश्लील भाषा वापरून मुलींवर दबाव टाकत होता.

१९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी, आरोपी अबिद शेख याने बसमधून शाळेत जाणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा पाठलाग केला आणि वाईट हेतूने तिचा हात धरून छेडछाड केली. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे ती विद्यार्थिनी खूप घाबरली आणि भीतीने गप्प बसली. मात्र, तिच्या कुटुंबीयांना तिच्यात झालेला बदल लक्षात आला. त्यांनी अधिक चौकशी केली असता, बसचालकाने आपल्या मुलीशी गैरवर्तन केल्याचे समोर आले.

यानंतर, पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी तात्काळ पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. तक्रारीनंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करत बसचालक अबिद हुसेन शेख विरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांनी आरोपीला कोणताही विलंब न करता तात्काळ अटक केली. सध्या, या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

या घटनेमुळे शेंदुर्णीसह जामनेर, पाचोरा आणि सोयगाव तालुक्यात संतापाची लाट पसरली आहे. जनतेने आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अशा घटनांमुळे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याबाबत द्विधा मनस्थितीत आहेत. त्यामुळे, खासगी शैक्षणिक संस्थांनी आपल्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यापूर्वी त्यांची चारित्र्य पडताळणी करणे किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा एकदा समोर आले आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button