खान्देशजळगांव जिल्हासामाजिक

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाची जय्यत तयारी: तालुक्यातील अनेक प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार लय भारी समजेल यावरून खरच आहेत कोण जनतेचे कैवारी !

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाची जय्यत तयारी: तालुक्यातील अनेक प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार लय भारी समजेल यावरून खरच आहेत कोण जनतेचे कैवारी ! 
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आज पाचो-यात !
पाचोरा ■ ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी उद्या मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाचोरा शहरात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत अनेक प्रकल्पांचे उद्घाटनही करण्यात येणार आहे. शासन आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत ‘योजना जनकल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी’ अशी अंमलबजावणी संपूर्ण राज्यभरात सुरू आहे. याच अनुषंगाने पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघासाठी शिंदे सेनेचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आग्रह धरल्यामुळे हा कार्यक्रम पाचोरा तालुक्याच्या ठिकाणी राबविण्यात येत आहे. १२ रोजी सकाळी ११ वाजता एम एम कॉलेज ग्राउंड पाचोरा येथे या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांचा दौरा प्राप्त झाला असून ते विमानाने जळगाव येथे येणार आहेत येथून मोटार येणे पाचोरा येथे रवाना होणार आहेत दिवसभर अनेक प्रकल्पांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहणार आहेत, मात्र अद्याप त्याचा दौरा प्राप्त झाला नसल्याचे  प्रशासनातर्फे सांगण्यात आले. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे प्रथमच पाचोरा तालुक्यात येत आहेत. या अगोदर महाविकास आघाडीचे सरकार असताना एकनाथ शिंदे यांनी अचानकपणे पाचोरा तालुक्याचा दौरा केला होता. यावेळी चर्चेला उधाण आले होते मात्र हा दौरा देवीच्या दर्शनासाठी होता, असेही नंतर सांगण्यात आले.
मुख्यमंत्र्यांचा दौरा याप्रमाणे  मंगळवार १२ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता शासकिय विमानाने मुंबई येथून जळगाव विमानतळ येथे आगमन व हॅलिकॉप्टरने मौजे हडसन शिवार हेलीपॅड, ता. पाचोरा, जि. जळगावकडे प्रयाण. दुपारी १२.१५ वा. मौजे हडसन शिवार हेलीपॅड  येथे आगमन व मोटारीने एम. एम. कॉलेज मैदान पाचोराकडे प्रयाण.
दुपारी १२.३० वा. शासन आपल्या दारी कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ एम. एम. कॉलेज मैदान पाचोरा) दुपारी २.३० वा. मोटारीने मौजे नांद्रा ता. पाचोराकडे प्रयाण. दुपारी २.५० वा. नर्मदा अॅग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट या कंपनीचे उद्घाटन व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) मौजे निंभोरा (नगरदेवळा रेल्वेस्टेशन जवळ), ता. भडगाव, जि. जळगाव व पाचोरा येथे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नविन मुख्य इमारत बांधकामाचे ई-भुमीपुजन (स्थळ- नांद्रा ता. पाचोरा, जि. जळगाव), दुपारी ३.३० वा. मोटारीने मौजे हडसन शिवार हेलीपॅडकडे प्रयाण. दुपारी ३.४५ वा. मौजे हडसन शिवार हेलीपॅड येथे आगमन व हेलीकॉप्टरने जळगाव –
विमानतळाकडे प्रयाण. ४.१५ वा. पाळधीत
■ शासकीय कार्यक्रमात ठाकरेंच्या आरोपांना उत्तर देणार का?
दोनच दिवसापूर्वी माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची जळगाव येथील पिंप्राळा येथे जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सह राज्यातील सत्ताधाऱ्यांवर बोचरी टीका केली. ‘बाप चोरणाऱ्यांची औलाद..’ असेही घणाघाती आरोप त्यांनी केले. या आरोपांना आजच्या सभेत मुख्यमंत्री शिंदे काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शासकीय कार्यक्रमात ते अशा प्रकारच्या आरोपांना उत्तर देतील का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
ना. गुलाबराव पाटील यांचे निवासस्थानी आगमन व राखीव, ४.५० वा. पाळधी येथून मोटारीने पाळधी बायपास हेलीपॅडकडे प्रयाण, ५ वा. पाळधी हेलीपॅड येथे आगमन व हेलिकॉप्टरने जळगाव विमानतळाकडे प्रयाण, ५.२० वा. विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण याप्रमाणे
दौरा राहणार आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button