जळगाव जिल्ह्यात चाललंय काय ? मंडळ अधिकारी बबिता चौधरी यांचेवर वढोदा शिरसाड रस्त्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न !

जळगाव जिल्ह्यात चाललंय काय ? मंडळ अधिकारी बबिता चौधरी यांचेवर वढोदा शिरसाड रस्त्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न !
जळगाव, 1 सप्टेंबर : यावल तालुक्यातील शिरसाड गावाजवळ वाळुची विनापरवाना वाहतुक करणाऱ्यांकडून महीला पर्यवेक्षकास विनयभंग करीत मारहाण व जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. दरम्यान, याप्रकरणी महसूल अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन सादर केले. तसेच जिल्हाधिकारी प्रसा यांनी याप्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
अशी आहे संपूर्ण घटना.
यावल तालुक्यातील बामणोद येथील कार्यरत मंडळ अधिकारी बबिता चौधरी यांचेवर वढोदा शिरसाड रस्त्यावर अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्या व्यक्तींनी त्यांचा हात धरून ट्रॅक्टर वरून ओढून खाली पाडले व जखमी केले. तसेच जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, याप्रकरणी मंडळ अधिकारी बबीता चौधरी यांनी यावल पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने विविध कलामान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा अधिका-यांचे पोलीस व महसूल प्रशासनाला कारवाईचे आदेश –
गौणखनिजांची अवैध वाहतूक व शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे महसूल अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना काल निवेदन सादर केले. क्षेत्रीय पातळीवर घडलेल्या घटनेची जिल्हाधिकारी यांनी दूरध्वनीद्वारे माहिती घेतली. गोणखनिजांचे अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध मोहीम स्तरावर कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पोलीस व महसूल प्रशासनाला दिले आहेत.



