पाचोऱ्यातील विद्यार्थिनीचे बुद्धिबळ स्पर्धेत यश !

पाचोऱ्यातील विद्यार्थिनीचे बुद्धिबळ स्पर्धेत यश !
पाचोरा : क्रीडा व युवासेवा
संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगांव द्वारा आयोजित जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा १० रोजी १४ वर्ष आतील व ११ रोजी १७ वर्षे आतील बुद्धिबळाचे सामने कांताई सभागृह या ठिकाणी झाले. त्यात १७ वर्षा आतील मुलींमध्ये पाचोरा येथील गुरुकुल इंटरनेशनलची विद्यार्थिनी आदिती अलाहीत हिने जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावून विभागीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. १४ वर्षाआतील मुलींमध्ये गुरुकुलचीच विद्यार्थिनी श्रावणी अलाहित हिने जिल्हास्तरावर विजय मि ळवून विभागीय स्तरासाठी पात्र ठरली आहे. विजयी खेळाडूंचे गुरुकुल प्राचार्य प्रेम शामनानी, पर्यवेक्षिका अमेना बोहरा व शाळेतील शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले. विजयी खेळाडूंना क्रीडा शिक्षक दिलीप चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.



