खान्देश

स्वप्निल बागुल यांना क्रियाशील कार्यकर्ता पुरस्कार

स्वप्निल बागुल यांना क्रियाशील कार्यकर्ता पुरस्कार

पाचोरा- महात्मा ज्योतिबा फुले शिक्षक परिषदेतर्फे खडकदेवळा ता. पाचोरा येथील माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक स्वप्नील बागुल यांना क्रियाशील कार्यकर्ता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सावंतवाडी कोकण येथे झालेल्या दिमाखदार समारंभात माजी खासदार तथा राष्ट्रीय सैनिक फाउंडेशनचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन स्वप्नील शिवाजी यांचा गौरव करण्यात आला.

महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेची 13 वी राष्ट्रीय परिषद सावंतवाडी कोकण येथील नगरपालिका नाट्यगृहात दिनांक 19 नोव्हेंबर 2023 रोजी संपन्न झाली. या या परिषदेत स्वप्नील बागुल यांना सन्मानित करण्यात आले. स्वप्नील शिवाजी बागुल हे माध्यमिक विद्यालय खडकदेवळा या शाळेचे उपशिक्षक असून पाचोरा येथील अ.भा. मराठा महासंघाचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून सुपरिचित आहेत. महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेच्या संघटनात्मक कार्यात त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना हा बहुमान मिळाला

याप्रसंगी महात्मा ज्योतिबा फुले शिक्षक परिषदेचे प्रदेश अध्यक्ष व्यंकटराव जाधव, कुणबी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष गिरीश जाधव, संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्रा. शिवाजी शिंदे, जिल्हासचिव प्रवीण मोरे (चाळीसगाव), गजेंद्र कानडे (दोंडाईचा), खडकदेवळा माध्यमिक विद्यालयाच्या पर्यवेक्षक श्रीमती कुंदा पाटील, उपशिक्षक चंद्रकांत पाटील, कृष्णा पाटील, भावेश अहिरराव, राजेंद्र पाटील, प्रा. डॉ. गिरीश पाटील (नाशिक), आदी मान्यवर उपस्थित होते.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button