भाजप तर्फे पिंपळगाव हरेश्वर येथे ‘काळा दिवस’ साजरा; २५ ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार

भाजप तर्फे पिंपळगाव हरेश्वर येथे ‘काळा दिवस’ साजरा; २५ ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार
पिंपळगाव हरेश्वर, दि. २५ जून २०२५: भारतीय जनता पार्टी, पिंपळगाव तर्फे आज आणीबाणीच्या विरोधात ‘काळा दिवस’ अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी आणीबाणीच्या काळात लोकशाही मूल्यांसाठी संघर्ष केलेल्या २५ ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा-भडगाव विधानसभेचे माजी आमदार दिलीप भाऊ वाघ उपस्थित होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून आणीबाणीच्या कालखंडातील आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून नरेंद्र पाटील शिंदाड यांनी आणीबाणीच्या काळातील घटनाक्रम आणि त्याचे भारतीय लोकशाहीवरील परिणाम यावर सविस्तर माहिती दिली. त्यांनी उपस्थितांना आणीबाणीच्या काळात लोकशाही स्वातंत्र्यासाठी दिलेल्या संघर्षाची आठवण करून दिली.
यावेळी व्यासपीठावर मधुकर काटे (माजी जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा उपाध्यक्ष, भाजप जळगाव), विजय कडू पाटील, एन. सी. तात्या पाटील, अशोक कृष्णराव पाटील, विनोद महाजन, जयतमल सर, नगरदेवळा मंडळ अध्यक्ष गोविंदजी शेलार आणि पिंपळगाव मंडळाच्या अध्यक्षा शोभाताई तेली आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय झेरवाल यांनी केले. उपस्थित मान्यवर आणि कार्यकर्त्यांच्या सहभागाने हा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.



