कृषी दिनानिमित्त प्रगतीशील शेतकर्यांचा सन्मान ! वैशालीताई सुर्यवंशी यांचा पुढाकार; किटचे वाटप !

कृषी दिनानिमित्त प्रगतीशील शेतकर्यांचा सन्मान ! वैशालीताई सुर्यवंशी यांचा पुढाकार; किटचे वाटप !
पाचोरा दिनांक ( १ प्रतिनिधी ) : आज कृषी दिनाचे औचित्य साधून शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शेतकर्यांना शेतकर्यांना पालेभाजांच्या विविध बिया आणि वाणांचा समावेश असलेल्या किटचे वाटप करून सन्मानीत करण्यात आले.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती आज कृषी दिन म्हणून सर्वत्र साजरी करण्यात येत आहे. या अनुषंगाने पाचोरा येथील शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मध्यवर्ती संपर्क कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते कै. वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर मतदारसंघातील उत्तम दर्जेदार प्रगतीशील शेती करणार्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यात प्रत्येकाचे पुष्पगुच्छ, शाल-श्रीफळ आणि बियाण्यांचे किट देऊन सन्मानीत करण्यात आले. या किटमध्ये निर्मल सीडस कंपनीने विकसित केलेल्या पालेभाज्या तसेच विविध पिकांच्या बियाण्यांचा समावेश होता.

या कार्यक्रमात पाचोरा येथील रमेश बाफना, गुढे येथील दिलीप देविदास पाटील, होळ येथील गणेश ड्रायव्हर, गोंडगाव येथील पुरूषोत्तम जाधव, वडगाव आंबे येथील निखील भुसारे, नाचणखेडा येथील तुकाराम महाजन व सुभाष पाटील, वडगाव आंबे येथील सविता शेळके आणि संतोष पाटील, पुनगाव येथील अनिल महाजन व दीपक परदेशी, कोल्हे येथील संतोष पाटील, वलवाडी येथील राजेंद्र रघुनाथ पाटील, नालबंदी येथील देविदास जाधव, पिंप्री येथील आनंदराव पाटील, वडगाव आंबे येथील शिवलाल पवार, वाडी शेवाळे येथील डिगंबर पाटील, वरसाडे तांडा येथील लखीचंद पवार, कोकळीतांडा येथील राजू चव्हाण, कोल्हे येथील अशोक पाटील, गाळण येथील संजय राठोड, लोहटार येथील विजय वाणी, खडकदेवळा येथील बारकू पाटील, पुनगाव येथील प्रमोद नाना पाटील, नरगदेवळा येथील नाना महाजन, सामनेर येथील दत्तू रामकृष्ण पाटील, कुरंगी येथील ज्ञानेश्वर भिवसन पाटील, पहाण येथील आबा गोबा महाजन, दुसखेडा येथील शशिकांत पाटील, परधाडे येथील अशोक पाटील, बांबरूड राणीचे येथील मिथुन वाघ, भोरटेक येथील संजू नाना, वाडे येथील राजू तात्या, वलवाडी येथील मनोहर पाटील, भडगाव येथील नाईक साहेब, गोंडगाव येथील दत्तू मांडोळे, शिंदाड येथील प्रदीप पाटील, मंगेश तुळशीराम पाटील आणि विनोद किसन लोधी या शेतकर्यांना सन्मानीत करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्यासह अरूण पाटील, शरद पाटील, ज्ञानेश्वर चौधरी, अनिल सावंत, संदीप जैन, भरत खंडेलवाल, अभिषेक खंडेलवाल, अरूण तांबे, संतोष पाटील, निखील भुसारे, बाळू अण्णा, योजनाताई पाटील, विकास वाघ, वामन वाघ, दिलीप पाटील, राजू गायकवाड, सविता शेळके, सिकंदर गुलाब तडवी व मिथुन वाघ आदी पदाधिकारी व मान्यवरांची उपस्थिती होती.



