ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, समाजसेवक अशोक बापु परदेशी यांचा अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न !

ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, समाजसेवक अशोक बापु परदेशी यांचा अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न !
वाडे ता. भडगाव येथील भुमिपुञ ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ साहित्यिक, ज्येष्ठ समाजसेवक अशोक बापु परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्त वाडे येथे जळगाव जिल्हा परिषद चे चोपडा येथील आदर्श शिक्षक तथा शिरपूरचे रहिवासी प्रवीण शांताराम माळी यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर गाजलेला तुफान विनोदी एकपात्री प्रयोग आयत पोयत सख्यान सादर केला. या प्रयोगाच्या माध्यमातून त्यांनी अशोक बापुंच्या कार्यकर्तुत्वाचा गौरव केला. अशोक बापु सारखा निस्वार्थी लोकाभिमुख नेता कसा असतो याबाबतीत विवेचन केले. सोबतच आपल्या प्रयोगाच्या माध्यमातून त्यांनी व्यसनाधीनता, आपल्या खानदेशी लोकसंस्कृतीमध्ये निर्माण झालेल्या विकृती, मुलीचा बापाचे कष्ट, आजचा युवक आणि युवती आदर्श कसे असावेत तसेच आपल्या अहिराणी गीतांचे संवर्धन, आपले खाद्य संस्कृतीचे संवर्धन ,आपल्या सण उत्सवांच संवर्धन कसे करावे याबाबत हास्याचे फवारे उडवत प्रबोधन केले . आपल्या मुलांना कोणतीही भाषा शिकवा पण अहिराणी भाषेचे शब्द त्यांना समजायला पाहिजे यासाठी त्यांचा हा प्रयत्न कौतुकास्पद होता. आई-वडील आपल्या मुला मुलींविषयी कधीच वाईट चिंतीत नाही. म्हणून आई-वडिलांच्या संमतीने लग्नासाठी योग्य जोडीदार निवडा असेही यावेळी त्यांनी सांगितले. ५ वर्षाचे बालक ते ८० वर्षाचे म्हातारे यांना सतत दोन तास आपल्या कथनातून गुंफून ठेवणारे प्रवीण माळी यांनी उत्तमरीत्या आपला प्रयोग सादर केला. पाचोरा आणि भडगाव नगरीचे, पत्रकार संघाचे त्यांनी विशेष आभार मानले. की माझ्या एकपात्रीची सुरुवात या दोन तालुक्यातून झालेली आहे. तसेच वाढदिवसानिमित्त केवळ शुभेच्छा न देता गावातील युवकांचे, माता-भगिनींचे, ज्येष्ठ श्रेष्ठांचे समाजप्रबोधन व्हावे यासाठी अशोक बापुंचा हा प्रयत्न खूपच गौरवास्पद आहे असेही ते म्हटले. याप्रसंगी पञकार अशोक बापु परदेशी यांना भविष्यातील त्यांच्या यशस्वीतेसाठी, समाजकार्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्यात.



