खान्देश

रिपाई चा द ग्रेट रिपब्लिकन कार्यकर्ता पुरस्कार भडगाव तालुका अध्यक्ष एस. डी. खेडकर आण्णा यांना प्रदान..

रिपाई चा द ग्रेट रिपब्लिकन कार्यकर्ता पुरस्कार भडगाव तालुका अध्यक्ष एस. डी. खेडकर आण्णा यांना प्रदान..

भडगाव- प्रतिनिधि- (संजय शेवाळे)-रिपाई चा द ग्रेट रिपब्लिकन कार्यकर्ता पुरस्कार भडगाव तालुका अध्यक्ष एस. डी. खेडकर आण्णा यांना प्रदान..

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास जी आठवले साहेब यांच्या आदेशाने प. महाराष्ट्र अध्यक्ष तथा लोणावळा नगर परिषद चे माजी नगराध्यक्ष आदरणीय सूर्यकांत वाघमारे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत लोणावळा येथील कुमार रिसॉर्ट मध्ये आयोजित केलेल्या रिपाई चा द ग्रेट रिपब्लिकन कार्यकर्ता पुरस्कार सोहळा नुकताच संपन्न झाला त्यात भडगाव तालुका अध्यक्ष एस. डी. खेडकर आण्णा यांना सन्मान पत्र व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आला रिपाई चे राज्य सरचिटणीस गौतम दादा सोनवणे, प. महाराष्ट्र अध्यक्ष आदरणीय सूर्यकांत वाघमारे साहेब, नगर जिल्हा अध्यक्ष सुनील साळवे यांच्या सह प्रमुख मान्यवर यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
तालुक्यात विविध आंदोलने. मोर्चा, रास्ता रोको, जनहिताची उपोषणे, या सह विविध मागण्यांचे निवेदन देऊन गाव तिथ शाखा उपक्रम राबवून गोर गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न या कार्याची थेट दखल घेत पुरस्काराणे सन्मानित करण्यात आले. त्यांचे रिपब्लिकन पक्षाचे राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, प. महाराष्ट्र अध्यक्ष आदरणीय सूर्यकांत वाघमारे साहेब,उत्तर महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष तथा राज्य उपाध्यक्ष रमेश मकासरे, जळगाव जिल्हा अध्यक्ष राजू भाऊ सुर्यवंशी, जळगाव लोकसभा जिल्हा प्रमुख आनंद खरात, युवा जिल्हा अध्यक्ष भगवान भाई सोनवणे यांच्या सह विविध पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, मित्र परिवार यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button