JTSC आयोजित शिक्षक चषक 2023 चा पाचोरा शिक्षकांचा संघ ठरला मानकरी!

JTSC आयोजित शिक्षक चषक 2023 चा पाचोरा शिक्षकांचा संघ ठरला मानकरी!
जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील सर्व शिक्षकांसाठी क्रिकेट स्पर्धा 8,9 व 10 डिसेंबर एम.के.स्पोर्टस मैदान,जळगाव येथे आयोजित करण्यात आली होती.यात जिल्ह्यातील 16 संघ सहभागी होते. अंतिम सामना रावेर विरुद्ध पाचोरा संघ यांच्यात झाला.
जळगांव टीचर्स स्पोर्ट्स क्लब आयोजित शिक्षक चषक 2023 च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता सांघिक कामगिरीने सर्वांना प्रभावित करणारा पाचोरा संघ ठरला.बेस्ट बॉलर हा पुरस्कार महेश सोनवणे सर पाचोरा,अंतिम सामन्याचा सामनावीर पुरस्काराचा मानकरी पाचोरा संघाचा कर्णधार दिपक धनगर सर ठरले.विजेत्या संघाकडून अजय पाटील,जिजाबराव पाटील,नकुल बोरसे,सचिन पाटील सर यांनी प्रभावी गोलंदाजी केली तर महेश रोकडे,समाधान पाटील,अजिंक्य पाटील,प्रवीण जोहरे,आशिष पाटील यांनी प्रभावी फलंदाजी केली.पाचोरा संघास गटशिक्षण अधिकारी समाधान पाटील साहेब,भावेश अहिरराव,विपीन पाटील,राजेंद्र पाटील,चंद्रकांत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.



