खान्देश

शिंदे गटाच्या प्रत्येक आमदारांकडून विधानसभाध्यक्षांना ६,५०० पानांचे प्रतिज्ञापत्र सादर !

शिंदे गटाच्या प्रत्येक आमदारांकडून विधानसभाध्यक्षांना ६,५०० पानांचे प्रतिज्ञापत्र सादर !

मुंबई,(प्रतिनिधी): अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान शिंदे गटाच्या प्रत्येक आमदारांकडून विधानसभाध्यक्षांना ६,५०० पानांचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले असून यात आम्ही आपत्र नाहीच आम्हीच खरी शिवसेना असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान ठाकरे गटाच्या १४ आमदारांकडून पावसाळी अधिवेशनाच्या काळातच प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली होती.

महाराष्ट्रातील सत्तानाट्यावरील आमदार अपात्रतेची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुरू असून, या सुनावणीती दरम्यान आमदारांना त्यांचं म्हणणं मंडण्याची संधी देण्यात आली होती, प्रत्येक आमदार यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे सांगण्यात आले होते दरम्यान  शिंदे गटाच्या ३९ आमदारांकडून प्रत्येकी ६,५०० पानांचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. इतक्या लांबलचक प्रतिज्ञापत्रांवर अध्यक्ष काय निर्णय घेतात आणि यासाठी किती कालावधी लागेल, याबाबत सर्वांचे लक्ष लागून आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांवर सोपविण्यात आला आहे. योग्य कालावधीत ही निर्णय प्रक्रिया पार पाडण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. ही सुनावणी लवकरात लवकर व्हावी, यासाठी ठाकरे गट पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button