शैक्षणिक

कवी रमेश धनगर यांची मुलाखत उद्या जळगाव आकाशवाणीवर

कवी रमेश धनगर यांची मुलाखत उद्या जळगाव आकाशवाणीवर !

भडगाव प्रतिनिधि (संजय शेवाळे) कवी रमेश धनगर यांची मुलाखत उद्या जळगाव आकाशवाणीवर

गिरड ता भडगाव : येथील कवी तथा कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित जवाहर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक अहिराणी भाषेचे अभ्यासक, उपक्रमशील शिक्षक तथा कवी रमेश विरभान धनगर यांची जळगाव आकाशवाणीवरून मुलाखत सादर होणार आहे. उद्या दिनांक २६ एप्रिल बुधवार रोजी सकाळी १० वाजता मुलाखतीचे सादरीकरण होईल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार आहेत. स्पंदन’ या कार्यक्रमाअंतर्गत वृत्त आणि व्यक्तीत्व या कार्यक्रमात’ ही मुलाखत उद्घोषिका वैदेही नाखरे यांनी घेतली आहे. सदर दिलखुलास मुलाखतीत कवी रमेश धनगर यांनी अहिराणी लोकसाहित्य महती तसेच खान्देशातील साहित्य संस्था आणि त्यांची अहिराणी संवर्धनासाठी सुरू असलेली चळवळीवर प्रकाश टाकला आहे. अहिराणी संस्कृती संवर्धनाच्या दृष्टीने त्यांचं सुरू असलेले काम, एक उपक्रमशील शिक्षक म्हणून असलेली भूमिका देखील त्यांनी विषद केली आहे. याआधीही जळगाव आकाशवाणी केंद्रावरून ‘अहिराणी म्हणी नैतीकतेच्या खाणी’ याविषयावर त्यांचं भाषण झालं आहे. त्यांच्या या यशाबद्दल जळगाव जिल्हा बँक संचालक प्रतापराव पाटील, जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या संचालिका डॉ पुनम पाटील ग्रामविकास विभाग उपसचिव मंत्रालय मुंबई चे प्रशांतराव पाटील, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष शिवाजीराव पाटील प्राचार्य एस व्ही शिंदे, साहित्यिक क्षेत्रातील लोकांनी अभिनंदन केले आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button