खान्देशजळगांव जिल्हा

माणुसकी व्हाँट्सप ग्रुप तर्फे रक्षाबंधनाच्या निमित्ताने राखी बांधत महिला रूग्णांना साड्या भेट .!

माणुसकी व्हाँट्सप ग्रुप तर्फे रक्षाबंधनाच्या निमित्ताने राखी बांधत महिला रूग्णांना साड्या भेट .

पाचोरा (प्रतिनिधी) –  सु-लक्ष्मी सेवाभावी संस्था व रामभाऊ पांडुरंग कल्याणकर बहुद्देशिय सेवाभावी संस्था व ज्युनिअर चार्ली फाँडेशन ने राबवला स्तुत्य उपक्रम

धागा शौर्य की, राखी अभिमान की या म्हणी प्रमाणे कुटूंब व नातेवाईकासोबत नेहमीच सण साजरे करतो.पण जिथे ऐखादी अनओळखी आर्थिक परीस्थिने पिडलेली व रुग्णालयात अथंरुनाला खिळलेली बहीण रुग्णालयासारख्या कंटाळवाण्या वातावरणात आज राखीच्या दिवशी मी सण कसा साजरा करु या भावनेने तिचे मन काहूरलेले असते खिन्न असते तिथे माणूसकी समुहाची हो भावंड आजची राखी पौर्णिमा सालाबादा प्रमाणे दणदणीत साजरी करण्याचा चंग बांधून राख्या आणि साड्या घेऊन रुग्णालयात दाखल झाले. आणि मोठ्या आपूलकीने त्या अनोळखी स्रीला राखीचे बंधन बांधायला सांगून मायेने साडी आणि तिला आवश्यक असलेली औषधी भेट देऊन रुग्णालया सारख्या निरस वातावरण रसमय करण्याचे कार्य ही माणूसकी समुहाची भावंड अनेक वर्षापासून करत आलेली आहेत, याही वर्षी त्याच उत्साहाने गरजवंत रुग्णांन सोबत सण साजरा करून त्याच्या चेहऱ्यावर हसू व आनंद व्दिगुणित करता आला यासाठी शासकीय रुग्णालय जळगाव येथील,अस्थिव्यंग विभागामध्ये रुग्णालयातील महिला पेशंट ला एक राखी एक साडी या स्तुत्य उपक्रमा अंतर्गत साड्यांचे वाटप करण्यात आले आहे.व आवश्यक रुग्णांना औषधी साठी १०० रु भेट देवुन साड्या भेट दिल्यामुळे महिलांच्या चेहऱ्यावर हास्य दिसले,माणुसकीचे दर्शन झाल्याचे समाधान वाटले.यावेळी ज्युनिअर चाँर्ली फाँडेशन चे कलाकार,सुमित पंडित यांनी देखील चार्लीचॕपलीनच्या मुक आणि मुख अभिनयातून राखी बांधून घेऊन रूग्णांचा आनंद व्दिगुणीत केला.चार्लीनी आपल्या मुखकलेतून हसवत रुग्णांना आत्मियतेने माणुसकीचे दर्शन घडवून देत मोठी धमाल केली.
एक महिला रूग्ण अँडमीट आहे त्यांच महिलेच्या अश्रु अनावर झाले त्या मावलीने सांगितले कि आम्ही भाऊ वारल्यानंतर रक्षाबंधन साजरे करत नाही परतु आज अचानक माझ्या आयुष्यात तुम्ही भावासारखे धावून आलात राखी बांधली व साडी मीळाली आज ही माणुसकीची टिम माझ्यासाठी भाऊ बनून आले ,हे माझ भाग्यच आहे, त्या ताईने डोळ्यातून आनंदाश्रू काढत भाऊ बहिनीच्या नात्याला नव्याने उजाळा दिल्याचे त्या महिला पेशंट नी भाऊक होत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

माणुसकी व्हाँट्सप गृप व सु-लक्ष्मी चे अध्यक्ष सुमित पंडित यांच्या मानवीय विचारातून ह्या कार्याची सुरुवात झाली आहे, या उपक्रमाला अनेक शुभचितकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे ,त्यामुळे या उपक्रमाचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.
ह्या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रमुख उपस्थिती म्हणुन लाभलेले
किसन नजन पाटील साहेब पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव,
डॉ.गिरीष ठाकूर अधिष्ठाता जळगाव,डॉ.मारोती पोटे प्राध्यापक व विभागप्रमुख  सर्जरी विभाग,डॉ. सत्यजित विसपुते,कनिष्ठ निवासी, मेडीसीन विभाग,डॉ.विलास मालकर,सहाय्यक प्राध्यपक, पीएसएम विभाग,जळगाव शासकीय रुग्णालय, दानशूर व्यक्ती ज्यात,कीसन नजनपाटील साहेब स्थानिक गुन्हे शाखा जळगाव,सचिन सानप,
पोलीस निरीक्षक,पोह महेश महाजन,विजय पाटील,दर्शन ढाकणे,
स्थानिक गुन्हे शाखा जळगाव.यावेळी माणुसकी समुहाचे ज्युनिअर चार्ली सोमनाथ स्वभावाने,
समाजसेवक सुमित पंडित,भरतभाऊ कल्याकर,गजानन क्षिरसागर,चेतन पाटील,सौ.पुजा पंडित,
सौ,भारती कुमावत ज्ञानभारती फौंडेशन अध्यक्ष ,नयना झोपे ,उल्हास पाटील लाॅ कॉलेज प्रिंन्सीपल.व माणुसकी समुहाच्या सभासदांनी परीश्रम घेतले.

” संवादातून जाणून घेतल्या रुग्णाच्या समस्या”

आगामी काळात अशा समस्यावर मदत करावी या दृष्टीने प्रयत्न माणुसकी समुहातर्फे केला जातोय.
आज माणुसकीहिन झालेल्या ह्या समाजाला
समाजसेवक सुमित पंडित हे आज एक जीवंत उदाहरण आहेत.रूग्णांना आपुलकीने कोणीतरी चौकशी केल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले”या प्रसंगी किसन नजनपाटील साहेब पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव.यांनी माणूसकी वाट्सप ग्रुप,व माणूसकी समुह यांचे प्रमुख सुमित पंडीत यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा स्तुत्य उपक्रम हाती घेऊन रुग्णांच्या चेह-यावर आनंद फुलविला याचे करावे तेवढे कौतुक कमीच पडेल त्यांनी या उपक्रमा बद्दल आभार व्यक्त केले .

 

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button