पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समित परिसरामध्ये डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर फवारणी!

पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समित परिसरामध्ये डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर फवारणी!
पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा शहरातील परिसरात डेंगू मलेरिया सारखे जीव घेणे साथीचे आजार बळकावत असताना अशा साथींच्या आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील तसेच संचालक मंडळ यांनी त्वरित फवारणीचे नियोजन करून फवारणीला सुरुवात केली.
त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती परीसरामध्ये येणारे शेतकरी, कष्टकरी हात मजूर, व्यापारी यांच्यामध्ये साभापातीविषयी चांगली भावना निर्माण झाली , त्यामुळे मार्केट मध्ये येणारे व्यापारी शेतकरी बांधव त्यांचे आभार मानत आहेत . या प्रसंगी सभापती गणेश पाटील. सचिव बी. बी. बोरुडे, एम के ऍग्रो केमिकल्स चे संचालक मंगेश सोमवंशी तसेच विजय महाजन, दीपक सोनवणे आदी कर्मचारी बांधव उपस्थित होते.



