खान्देशजळगांव जिल्हा

पाचोरा नगरपरिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक बिलापोटी अवाजवी रक्कमेची मागणी करून अडवणूक करीत असल्यामुळे सुरेश गनसिंग पाटील यांचे आजपासून प्रांताधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण – जिल्हाधिकारी यांना निवेदन!

पाचोरा नगरपरिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक बिलापोटी अवाजवी रक्कमेची मागणी करून अडवणूक करीत असल्यामुळे सुरेश गनसिंग पाटील यांचे आजपासून प्रांताधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण – जिल्हाधिकारी यांना निवेदन!

पाचोरा (वृत्तसेवा) – पाचोरा नगरपरिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक बिलापोटी अवाजवी रक्कमेची मागणी करून अडवणूक करीत असल्यामुळे सुरेश गनसिंग पाटील यांचे आजपासून प्रांताधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषनाचा इशारा देऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे निवेदनातीला मजकूर पुढील प्रमाणे ! माझ्या संस्थेने (सिटी वेस्ट मॅनेजमेंट सेल्स अँड सर्व्हिस) पाचोरा नगरपरिषदेस जंतूनाशके पुरविणे व घंटगाडया दुरुस्ती करणे अशी पुरवठा व सेवेची कामे केलेली असुन दि.०३/०४/२०२३ रोजी एकूण रु.१५,०६,३००/- पैकी बिलापोटी रु.६,००,०००/- अदा केलेले आहेत. परंतु उर्वरीत बिलासाठी गेल्या ५ ते ६ महिन्यापासून वारंवार नगरपरिषद मुख्याधिकारी शोभा बावीस्कर यांना भेटून बिलाची मागणी केली असता अगोदर ३०% प्रमाणे रु. २,७०,०००/रुपये रोखीने लेखाविभागात जमा करा अन्यथा बिल मिळणार नाही. तुम्ही कुठेही गेलात तरी मला वर पर्यंत पैसे द्यावे लागतात त्यामुळे सदर रक्कम दिल्या शिवाय चेक मिळणार नाही. असे सांगून अडवणूक करीत आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

इतक्या मोठ्या रक्कमेची तरतूद करून दिल्यास संस्थेला मोठे नुकसान होईल. संस्थेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने खूप मानसिक तान सहन करावा लागत आहे. इतर बिले वेळेवर अदा केली जात असून आम्हाला पैसे न दिल्यामुळे अडवणूक केल्याचे निदर्शनास येत आहे. यापूर्वी लोकप्रतिनिधी असतांना अशी अडचण आलेली नाही परंतु प्रशासक काळात अशा प्रकारे अवाजवी पैश्यांची मागणी होत असल्याने दि.२१/०९/२०२३ रोजी सकाळी ११ वाजेपासून मी अंतिम पर्याय म्हणून पाचोरा विभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा मार्ग पत्करला आहे. तरी वरिष्ठांनी माझे बिलासंबंधी न्याय द्यावा ही विनंती. असे निवेदन देऊन बेरोजगार तरुणाने न्यायाची अपेक्षा केली आहे .

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button