पाचो-यात छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

पाचोऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पाचोरा, जि. जळगाव: आज, गुरुवार, दि. २६ जून २०२५ रोजी पाचोरा येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. सुमारे ६०० ते ६५० नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. या कार्यक्रमासाठी पाचोरा मंडळातील विविध विभागांचे अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरात विविध शासकीय योजना आणि सेवा नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आल्या. अनेक नागरिकांनी विविध दाखले आणि योजनांचा लाभ घेतला.
शिबिरात उपस्थित मान्यवर: या शिबिराला स्थानिक आमदार किशोर पाटील, उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, माजी जिल्हा परिषद सदस्य मधुभाऊ काटे, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, तहसीलदार विजयजी बनसोड, गटविकास अधिकारी, भडगाव आरटीओ, आरोग्य विभाग, परिवहन विभाग, तसेच परधाडे, दुसखेडे आणि भातखंडे येथील सरपंच व मंडळ अधिकारी उपस्थित होते.
शिबिरात मिळालेले लाभ: या शिबिरात नागरिकांना विविध विभागांकडून खालील सेवा आणि माहिती पुरवण्यात आली:
- संजय गांधी योजना: ६५ लाभार्थी
- आरोग्य तपासणी: ५७ लाभार्थी
- आयुष्यमान कार्ड वाटप: २२ लाभार्थी
- कृषी कार्यालय: ३४ नागरिकांना माहिती
- पुरवठा शाखा:
- नवीन शिधापत्रिका लाभ: ३५
- आलेले अर्ज: १२३
- CSC केंद्र:
- आधार कार्ड वाटप: ०
- आलेले अर्ज: २२
- माहिती दिलेले: ३५
- पंचायत समिती विभाग: ५६ नागरिकांना माहिती
- ICDS योजना: ४ लाभार्थींना बेबी किटचे वाटप
- महसूल विभाग:
- जिवंत सातबारा वाटप: ४५
- उत्पन्न दाखले वाटप: ३५
- रहिवासी दाखले वाटप: ०
- नॉन-क्रिमीलेअर दाखले: १२
- बँक ऑफ बडोदा: ५५ नागरिकांना माहिती
- MSEB (महावितरण): १२ अर्ज प्राप्त
- पशुवैद्यकीय विभाग: ०
पावसाच्या आगमनाने पाऊस सुरु असल्याने मात्र ग्रामीण भागातील गरजू लोक मात्र तरीही लाभापासून वंचित राहिले परंतु या शिबिरामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी अनेक शासकीय सेवांचा लाभ घेणे शक्य झाले, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि श्रम वाचले. या अभियानाला मिळालेल्या प्रतिसादावरून असे दिसून येते की नागरिकांमध्ये शासकीय योजनांची माहिती आणि सेवा मिळवण्यासाठी मोठी उत्सुकता आहे.



