अन्य

गरिबांसाठी आधार ठरणाऱ्या आधारवडला सात वर्षे पूर्ण !

#आधारवड_ला_सात_वर्ष_पुर्ण

पाचोरा (प्रतिनिधी) – शहरामध्ये मागील #सात_वर्षापासून( १ एप्रिल २०१८ ) स्व #चि_देवांश याच्या पुण्यस्मरणार्थ शहरातील काही युवकांनी मिळून #राजे_संभाजी_युवा_फाउंडेशन संचालित #आधारवड म्हणून एक सामाजिक उपक्रम सुरू केला  या उपक्रमाला

आज १ एप्रिल २०२५ ला सात वर्ष पूर्ण झाले*

#आधारवड उपक्रम अंतर्गत दररोज किमान ७०/८० गरीब निराधार लोकांना जेवण दिले जाते covid-19 महामारी मध्ये सुद्धा या आधारवड ने अनेक गरजू गरीब लोकांन पर्यंत अन्न व गरजेचे वस्तू पुरवण्याचे अनमोल काम आपल्या परिसरा मध्ये केले

आपल्या शहरातील काही व्यवसायिक तरुण प्रवीण पाटील, भूषण देशमुख ,राहुल पाटील ,रवींद्र देवरे यांच्या संकल्पनेतून आधारवड उपक्रम सुरू झाला आधारवड ला हळू हळू मदतीचे हात जोडले गेले त्यात कै.महेंद्र शेठ अग्रवाल , महेंद्र रायगडे , पो. कॉ. किरण दादा पाटील , लक्ष्मण पाटील, सचिन सदांशीव यांचादेखील सहभाग आहे

आधारवड संस्थेत मागील सात वर्षापासून ज्या अन्नदात्या ने आणि सहकाऱ्यांनी आधारवडला सहकार्य केले अशा दात्यांचे मनापासून खूप खूप आभार व्यक्त करत आधारवड नेहमीच कशाही प्रकारच्या सामाजिक लोक हिता करता सामोरे  जाण्याकरता नेहमी तत्पर असेल असे मत व्यक्त केले तर आधारवड चे ध्येय काय ते ही स्पष्ट करण्यात आले.

ध्येय- #आधारवड च्या माध्यमातून गोरगरीब भुकेलेल्या पीछाडलेला या सर्वच नीआश्र असलेल्या लोकांपर्यंत पोहोचणे आणि एक वेळेची का होईना त्यांच्या पोटाची भूक मिटवण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो आधारवड ला पाचोरा शहर व शहराबाहेरून खूप पसंती दिली जाते हेच प्रेम हाच विश्वास आणि ह्याच आपल्या सहयोगाने आधारवड आज सात वर्ष पूर्ण करत आहे

नेहमीच आम्हाला सहकार्य करणारे पोलिस प्रशासन,सरकारी आस्थापने या करता आमचे हे कार्य सर्वत्र प्रसिद्ध करण्या करता *पाचोरा शहरातील पत्रकार बंधू नेहमीच* आमच्या पाठीशी ठाम पणे उभे असतात त्यांचे पण खूप खूप आभारतसेच प्रेम आणि सहयोग ठेवा हीच अपेक्षा या संचालकांनी यावेळी बोलतांना व्यक्त केली

#आपलेच_आधारवड

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button