खान्देश

भडगांव येथे बदलापूर घटनेचा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र निषेध…!

भडगांव येथे बदलापूर घटनेचा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र निषेध…!
भडगांव (प्रतिनिधी) : बदलापूर येथील आदर्श शाळेत चार वर्षीय दोन विद्यार्थीनींवर शिपाई कर्मचाऱ्याने अत्याचार केला. सदर घटना अत्यंत निंदनीय मानव जातीला काळीमा फासणारी आहे. नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी. गुन्हा दाखल करण्यास देखील टाळाटाळ करण्यात आली. तसेच गोंडगाव ता. भडगांव, कोलकत्ता येथील मेडिकल विद्यार्थीनिंवर अत्याचाराची घटना घडल्या त्यांना अजून न्याय मिळाला नाही. अशा प्रकारच्या अनेक घटना महाराष्ट्र राज्यासह देशात वारंवार घडत आहेत. कायदा व सुव्यवस्था यादृष्टीने अत्यंत धोक्यात आली आहे असे दिसते. आणि म्हणून या घटनेच्या निषेधाचे निवेदन पाचोरा – भडगांव शिवसेना नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात योजना पाटील, पुष्पा परदेशी, सिंधू वाघ, नसीम पठाण, हिना पठाण, गायत्री पाटील, रेखा शिससाठ, सुरेखा वाघ, शितल पाटील, मेघा पाटील, प्रतिभा पाटील, वैशाली पाटील, उषा मोरे, अनिता मोरे, प्रतिभा पाटील, बेबाबाई पाटील, आशा राजपूत, पूजा पाटील, वैशाली पाटील, कल्पना पाटील, निता भांडारकर, मनीषा पाटील आदी महिला पदाधिकारी समवेत दिपक पाटील, मनोहर चौधरी, शंकर मारवाडी, कैलास भावसार, माधव जगताप, चेतन रविंद्र पाटील, चेतन रंगनाथ पाटील, नरेंद्र राजपूत, नवल राजपूत, यश बिरारी, सुशील महाजन, रितेश महाजन, देविदास पाटील, सोमनाथ पाटील, संकेत सोमवंशी, दत्तात्रय पाटील आदी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी भडगांव नायब तहसीलदार सुधीर सोनवणे व पोलीस उपनिरीक्षक सी. पी. पालकर यांना देण्यात आले.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button