खडकदेवळा बु. साईबाबा मंदिराचा वर्धापन दिन साजरा !
खडकदेवळा बु. साईबाबा मंदिराचा वर्धापन दिन साजरा !
पाचोरा (प्रतिनिधी) – खडकदेवळा येथे दि. 26/08/2023 येथे एक वर्षा पूर्वी साई साईबाबा नवीन मंदिर समस्त गावकऱ्यांच्या मदतीने करण्यात आलं त्या मंदिराचं आज वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण गावात वाजत गाजत टाळ मृदुंग च्या गजरात साई पालखीची मिरवणूक काढण्यात आली. व विविध कार्यक्रम घेण्यात आले या शुभप्रसंगी शिवसेना नेत्या वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी पालखी सोहळयात सहभागी झाल्या व साईबाबांचा आशीर्वाद घेतला आणि राज्यासाठी व देशासाठी उज्वल कामना केली. या शुभप्रसंगी सरपंच अनिल विश्राम पाटील, माजी उपसरपंच प्रह्लाद रामदास पाटील, भगवान ज्योतीराम पाटील बारकू मोतीराम पाटील, धर्मराज सावंत पाटील, संभाजी शिवाजी पाटील, मुकेश बारकू पाटील, सचिन प्रल्हाद देवरे, शिवाजी कोळी, उल्हास पाटील, गणेश पाटील, अभय पाटील सह शिवसेना चे समस्त पदाधिकारी व जेष्ठ श्रेष्ठ नागरिक आणि समस्त ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते



