खान्देश

*दूध उत्पादक सोसायटी नवनियुक्त* *पदाधिकार्‍यांचा वैशालीताई सुर्यवंशी यांच्याहस्ते सत्कार*

*दूध उत्पादक सोसायटी नवनियुक्त*
*पदाधिकार्‍यांचा वैशालीताई सुर्यवंशी यांच्याहस्ते सत्कार*

दिनांक ९ -भडगाव- प्रतिनिधी (संजय शेवाळे,): तालुक्यातील बाळद बुद्रुक येथील दुग्ध उत्पादक सोसायटीचे नवनियुक्त चेअरमन तसेच व्हाईस चेअरमन यांचा सत्कार शिवसेना-उबाठा नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्याहस्ते करण्यात आला.

बाळद बुद्रुक सहकारी दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी नुकतीच अरुण सोमवंशी तर व्हाईस चेअरमनपदी शालीक जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ही निवड जाहीर होताच शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी या दोन्ही मान्यवरांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी आंबादास सोमवंशी, सुभाष सोमवंशी, रवि सोमवंशी, राजेंद्र मोरे, दिलीप मोरे, प्रमोद सोमवंशी, बाळु मोरे, माधवराव सोनवणे, हीरालाल चव्हाण, सतीश रावण मोरे, जितेंद्र भीमसिंग सोमवंशी, दिलीप वामन सोमवंशी, अमोल अशोक बाविस्कर, लक्ष्मण चव्हाण व भुपेश सोमवंशी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांची उपस्थिती होती.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button