पाचोरा तालुक्याचा सुपुत्र अमोल बनकर अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी सज्ज!

पाचोरा तालुक्याचा सुपुत्र अमोल बनकर अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी सज्ज!
पाचोरा, [27/05/2025]: पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथील सुपुत्र, जवान अमोल गोविंदा बनकर पुन्हा एकदा देशसेवेसाठी सज्ज झाले आहेत. नुकत्याच झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये नेपाळ सीमेवर कर्तव्य बजावल्यानंतर, आता ते अमरनाथ यात्रेच्या निमित्ताने जम्मू येथे आपली ड्युटी बजावण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांची ही निवड पाचोरा तालुका आणि तारखेडा गावासाठी अभिमानास्पद आहे.

अमोल बनकर हे १० जूनपर्यंत जम्मू येथे निमलष्करी दलाच्या, विशेषतः सशस्त्र सीमा बल (SSB) च्या १५६ व्या बटालियनमधील दोन कंपन्यांमध्ये आपले कर्तव्य बजावणार आहेत. आता पर्यत बंकर यांची 13 वर्ष देश सेवा झाली असून यात बिहार .नेपाळ बॉर्डर.आसाम भूतान बॉर्डर . उत्तर प्रदेश सनोली बॉर्डर . पश्चिम बंगाल. नागालँड. पंजाब. दिल्ली. छत्तीसगड. झारखंड. मणिपूर. हिमाचल प्रदेश. उत्तराखंड. कर्नाटक. मध्य प्रदेश. या ठिकाणी आपले कर्तव्य बजावले आहे . परत अमरनाथ यात्रे निमित ते जम्मू येथे आपले कर्तव्य बजावणार आहे व या माध्यमातून ते पाचोरा तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

३ जुलै ते ९ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या अमरनाथ यात्रेदरम्यान भाविकांना सुरक्षित प्रवास अनुभवता यावा यासाठी सुरक्षा व्यवस्थेची विशेष काळजी घेतली जाते. अशा महत्त्वपूर्ण मोहिमेत अमोल बनकर यांच्यासारख्या अनुभवी आणि कर्तव्यदक्ष जवानाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांच्या या देशसेवेच्या वृत्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे. पाचोरा आणि तारखेडा गावातील नागरिक त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आहेत.



