जळगांव जिल्हाताज्या बातम्या

मळगाव गावाच्या पाणी पुरवठा योजना कामाचा मुहुर्त सापडेना. पाणी प्रश्न वा-र्यावर

*भडगाव-प्रतिनिधि -(संजय शेवाळे)- मळगाव गावाच्या पाणी पुरवठा योजना कामाचा मुहुर्त सापडेना. पाणी प्रश्न वार्यावर*

सरपंच गुलाब जगन्नाथ पाटील यांचा आत्मदहनाचा इशारा. प्रशासनाचा हलगर्जीपणा.

जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व भडगाव पाचोरा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील प्रथम टँकर ग्रस्त असलेले मळगाव गावास जल जीवन मिशन अंतर्गत योजना सन २०२१, २०२२ या वर्षात १ कोटी १५ लाख ५६ हजार २०० रुपयाची मंजूर करून दिली.पण प्रशासनाने याबाबत दिरंगाई करत हलगर्जीपणामुळे आजवर मळगाव हे गाव नवीन

पाणीपुरवठा योजनेपासुन वंचित ठेवण्यात आलेले आहे . या पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा मुहुर्त प्रशासनाला कधी सापडेल? अशी चर्चा मळगाव ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्यांसह ग्रामस्थातुन होतांना दिसत आहे. ग्रामस्थ वर्गात प्रशासनाबाबत नाराजीचा सुर गवसत आहे. या पाणी पुरवठा योजनेच्या कामाला तात्काळ सुरुवात

करावी. अन्यथा आपण आत्मदहन करु. असा ईशारा मळगावचे सरपंच गुलाब पाटील यांच्यासह ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्यांसह ग्रामस्थांतुन दिला आहे .विहिरीच्या जागे अभावी कारण देत चाल ढकल का?चालु आहे.ग्रामपंचायत सरपंच पदाधिकारी सदस्य यांनी वारंवार जिल्हाधिकारी यांच्याकडून जागा मागणी केली आहे.

जिल्हाधिकारी यांनी गिरणा काठालगत पाणी पुरवठा विहीरीसाठी जागा मंजुर दि.२५/१०/२०२३ रोजी करून दिलेली आहे. तरी देखील ग्रामीण पाणीपुरवठा अधिकारी व प्रशासनाचे अधिकारी चालढकल करीत आहेत? वास्तव्य आमदार किशोर पाटील यांना सरपंच गुलाब पाटील, शैलेश मोरे यांची दोन दिवसापुर्वी भेट घेउन याबाबत व्यथा मांडल्या. आमदार किशोर पाटील यांनी संबंधित अधिकारी व संबधित ठेकेदार यांना धारेवर धरले व पाणी पुरवठा योजनेचे काम तात्काळ सुरु करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यानंतर सरपंच गुलाब पाटील व शैलेश मोरे यांनी पाणीपुरवठा अधिकारी दालनात जाऊन संबंधित अधिकार्यांची भेट घेउन या योजनेचे काम सुरु करण्याबाबत व्यथा मांडल्या आहेत.अधिकाऱ्यांना दोन दिवसाचे अल्टिमेट देण्यात आले. विहिरीचे काम तात्काळ सुरू न झाल्यास आत्मदहनाचा इशारा सरपंच गुलाब पाटील , शैलेश मोरे यांनी दिलेला आहे. माञ ग्रामीण पुरवठा विभागाचे अधिकारी उडवा उडवीचे नेहमी उत्तरे देत असल्याची खंत दै. लोकमतकडे बोलतांना मांडली. मळगाव हे गाव अवर्षण प्रवर्षण क्षेञात येते. मळगाव गावाचा संपुर्ण परीसर कोरडवाहु व डोंगराळ भागात नजरेस पडतो. गावाजवळ पाझर तलाव असुन या पाझर तलावात साचलेल्या पाण्यावर गावात जनतेसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची तहान कशी बशी भागविली जाते. पाऊसाळा चांगला झाला तर मळगावाच्या पाण्याचा काहीसा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होते. यावर्षी मळगाव परीसरात पाऊसाळा कमी बरसल्याने आता पाझरतलाव कोरडेठाक बनल्याचे दिसत आहे. परीणामी मळगावला पिण्याच्या पाण्याच्या पाणी टंचाईशी सामना दरवर्षी करावा लागतो. गावाला पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनाकडुन दरवेळेला टँकर सुरु करण्याची वेळ येते. पाण्याचे टँकरसाठी विहीरीचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्यांसह ग्रामस्थांना गिरणा काठावर गावागावात फिरण्याचीही वेळ येते. आता गावासाठी जलमिशन योजनेतुन पाणी पुरवठा योजना मंजुर झाली आहे. माञ गिरणा नदीकाठावर मळगावच्या पाणी पुरवठा योजनेसाठी विहीरीसाठी जागा मिळण्यास ञास होत आहे. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थांंना पाणी पुरवठा योजनेच्या विहीरीसाठी गिरणा काठावर जागा मिळण्यास व शासनाच्या जागा असुनही ञास सहन करावा लागत आहे. मळगावासाठी शासनाकडुन पाणी पुरवठा योजना मंजुर होऊनही या योजनेच्या कामाला सुरुवात का झाली नाही? याकडे ग्रामीण पाणी पुरवठा योजना विभागाच्या अधिकार्यांचे दुर्लक्ष का होत आहे? संबंधित ठेकेदाराचेही सोयीस्कर दुर्लक्ष का होत आहे? असा संतप्त प्रश्न मळगाव ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्यांसह ग्रामस्थांतुन उपस्थित होतांना दिसत आहे. जिल्हाधिकार्यांनी मळगाव गावाच्या पाणी पुरवठा योजनेसाठी गिरणा काठावर जागा मंजुर केली असुन तसे पञही दिलेले आहे. मग जिल्हाधिकार्यांच्या पञालाही संबंधितांनी केराची टोपली दाखविली आहे कि काय? असा प्रश्नही ग्रामस्थ वर्गातुन उपस्थित होतांना दिसत आहे. आमदार किशोर पाटील यांनी ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे अधिकारी, संबंधित ठेकेदाराला पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु करण्याच्या वेळोवेळी सुचना देऊनही संबंधितांचे दुर्लक्ष का होत आहे? असा सवाल मळगाव ग्रामस्थातुन उपस्थित केला जात आहे. तरी आता या पाणी पुरवठा योजनेचे कामास तात्काळ सुरुवात करावी. मळगाव गावाची कायमस्वरुपी पिण्याच्या पाण्याची सोय करावी. अशी मागणी मळगाव ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थवर्गातुन जोर धरीत आहे. या पाणी पुरवठा

योजनेच्या कामास तात्काळ सुरुवात करावी. अन्यथा आम्ही लोकशाही पद्धतीने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करु. असा ईशाराही दिलेला आहे. मळगाव गावाला नेहमी पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावते. टंकरसाठी पाण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकार्यांना परीसरात गिरणा काठावर फिरावे लागते. आता गावाला पाणी पुरवठा योजना मंजुर झाली आहे. जिल्हाधिकारी यांनी गिरण नदीकाठी जागा मंजुरीचे पञ दिलेले आहे. तरी जागेअभावी या योजनेचे काम रखडल्याचे आज तरी दिसत आहे. संबंधित ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे अधिकारी, प्रशासनाचे अधिकारी, संबंधित ठेकेदार आदिंचे याकडे का दुर्लक्ष होत आहे? असा सवाल ग्रामस्थ वर्गातुन

होत आहे. संबंधित अधिकार्यांचे याकडे दुर्लक्ष झाल्याबाबत चौकशी करण्यात यावी. तसेच आम्हाला गिरणा काठावर चांगल्या ठिकाणी विहीरीला जागा कोणतीही दया. परंतु आमच्या गावाला या योजनेचे काम सुरु करा. योजनेचे पाणी गावात पोहचवा. गावाची पाण्याची समस्या कायमची मार्गी लावा. अशी मागणी मळगाव ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्यांसह ग्रामस्थातुन होतांना दिसत आहे. याकडे आमदार किशोर पाटील यांनी लक्ष दयावे. अशी अपेक्षा आहे.

प्रतिक्रीया —

आमच्या गावाला पिण्याच्या पाण्याची जलजिवन मिशन योजना मंजुर झालेली आहे. यासाठी पाणी पुरवठा मंञी गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे.आमदार किशोर पाटील यांचे प्रयत्न व निधीतुन ही जलजिवन पाणी पुरवठा योजना मंजुर झालेली आहे. माञ गिरणा काठावर पाणी पुरवठा विहीरीसाठी

साधी जागा मिळत नाही. जिल्हाधिकार्यांनी गिरणा काठावर विहीर मंजुर केल्याचे पञही दिलेले आहे? तरीही आम्हाला शासनाकडुन विहीरीसाठी जागा मिळु शकत नाही? त्यात संबंधित अधिकारी दुर्लक्ष का करीत आहेत? चौकशी करावी. तसेच योजनेच्या कामाला

तात्काळ सुरुवात करावी. अन्यथा आम्ही जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करु.

आम्हाला न्याय पाहीजे.

गुलाब जगन्नाथ पाटील.

सरपंच. ग्रापंचायत मळगाव. ता. भडगाव. जि. जळगाव.

प्रतिक्रीया —

देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे झाली पण अनुभव आलेल्या सरकारी अधिकाऱ्यांचा सरासपणे डोळे झाक कशी करतात. मळगाव गावाची पाणी पुरवठा योजना मंजुर होऊनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत का नाही? हा आम्हाला अनुभव आलेला आहे .सरकारी कर्मचारी पाणी प्रश्नावर एवढे निष्काळजी कसे असु शकतात . अधिकार्यांना वेळोवेळी भेटल्यावर उडवा उडवीचे उत्तरे देतात. याचे आश्चर्य वाटते.

यांना कुणाचे वरदहस्त असते हेच कळत नाही. संबंधीत अधिकार्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. मळगाव च्या पाणी पुरवठा योजनेचे काम तात्काळ सुरु करण्यात यावे. गावाच्या पिण्याच्या पाण्याची कायमस्वरुपी समस्या सोडवावी.

शैलेश भाऊराव मोरे.

तालुका प्रमुख . शिवसेना शिवशक्ती, भिमशक्ती संघटना भडगाव .

प्रतिक्रीया —

आमच्या गावाची पाणी पुरवठा योजना तालुक्याचे आमदार किशोर पाटील यांच्या प्रयत्न व निधीतुन मंजुर झाली आहे.जिल्हाधिकार्यांनी गिरणा काठावर विहीरीसाठी जागा मंजुर केलेली आहे. मग आमच्या या योजनेच्या कामाला दिरंगाई का होत आहे? आम्हाला गिरणा काठावर कुठेही विहीरीला जागा दया पण मळगावाचा पाणी प्रश्न सोडवा. संबधित अधिकार्यांचे याकडे दुर्लक्ष होत असुन जिल्हाधिकार्यांनी स्वता भेट देउन हा प्रश्न सोडवावा. अन्यथा मळगाव येथील ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्यांसह ग्रामस्थ, महिला आंदोलन छेडतील. जिल्हाधिकार्यांनी गिरणा काठावर विहीरीसाठी जागा मंजुर केली मग विहीरीसाठी जागा का भेटु शकत नाही? मग जिल्हाधिकार्यांच्या पञाला काय किंमत राहीली आहे.

ऊषाबाई प्रताप परदेशी. महिला उपसरपंच. मळगाव ता. भडगाव.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button