निधी मिळावा म्हणून शेतकऱ्यांची तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना. चिमणराव पाटील यांच्याकडे मागणी

0 577

अमळनेर- पाडळसरे – येथून जवळच असलेल्या बोहरे येथील साने गुरुजी उपसा जलसिंचन योजना देखभाल दुरुस्ती व पुनरुज्जीवन साठी निधी नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून बंदच असून पाडळसरे धरणाच्या लाभक्षेत्रातील जळफुगवट्यामुळे जलसाठा असून ही शेतकऱ्यांना पाणी पुरवठा होत नसल्याने ही योजना लाखो रुपये खर्च करून धूळखात पडलेली आहे म्हणून तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार चिमणराव पाटील,आमदार अनिल पाटील, जिल्हाधिकारी, जलसंपदा मंत्री व मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे निधी उपलब्ध करून साने गुरुजी उपसा जलसिंचन योजनेचे पुनरुज्जीवन करण्याची मागणी पाडळसरे परिसरातील मारवड, बोहरे,गोवर्धन, डांगरी, सात्री,धार,कळमसरे, करणखेडा, धानोरा येथील पिडीत शेतकऱ्यांनी निधी उपलब्ध करून योजना सुरू करण्याची मागणी केली आहे ,
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सानेगुरुजी उपसा जलसिंचन सह संस्था मर्या.बोहरे ही योजना पाडळसरे परिसरातील १० गावांचे शेतीला तापी नदीतून शेतीला पाणी वाटप करणेसाठी दि.१९८३ साली स्थापन झाली. जोपर्यंत तापी नदीला भरपूर पाणी होते तोपर्यंत ही योजना बऱ्यापैकी सुरू होती. मात्र मध्यतरीच्या काळात अंदाजे १५ ते १८ वर्षे तापी नदी जानेवारी महिन्यापासूनच कोरडी झाल्याने ही योजना बंद पडली. मात्र नंतरच्या काळात पाडळसरे धरणात २ टि.एम.सी.पाणी अडवल्यामुळे व आमची योजना सुध्दा याच जलपुगवट्यामध्ये असल्यामुळे पाणी भरपूर असतांनासुध्दा आमची योजना आजपर्यंत बंद आहे. कारण ही योजना दिर्घकाळापासून बंद असल्यामुळे सर्व पाईप लाईन, सर्व व्हॉल्स, सर्व विद्युत मोटारी इतर तत्सम कामांसाठी आज अंदाजे १२ कोटी रूपयांची अत्यंत आवश्यक आहे. त्याबाबत सर्वेक्षण ही करण्यात आले असून अहवाल सादर करण्यात आला आहे
तांत्रिक कारणामुळे बंद योजना लवकर सुरू व्हावी म्हणून निवेदने दिलीत. तरी या ९ वर्षामध्ये योजना सुरू झाली नाही, शेतकऱ्यांची ही मोठी शोकांतिका आहे. ही योजना सुरू करणेसाठी नियामक मंडळाने दिनांक०४/१२/२०१३ रोजीच्या ४९ व्या बैठकीत ठराव क्रमांक-४६.२१२.२ अन्वये मान्यता प्रदान केली आहे. तसेच दि.११/०६/२०१९ रोजीच्या तत्कालीन मंत्री मंडळाच्या बैठकीत मंत्री मंडळाची प्रशासकीय मंजूरी मिळून ११ कोटी ४९ लाख ८७ हजार ८९२ रूपयांची सुध्दा प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे. परंतु आज पर्यंत मात्र प्रत्यक्षात निधी या योजनेला मिळाला नाही वास्तविक आमचा भाग व संपूर्ण अमळनेर तालुका कायमस्वरूपी अवर्षण प्रवण क्षेत्रात मोडत असतांना या योजनेला निधी देवून योजना सुरू करायला प्राधान्य पाहिजे. होते पण? हे आमचे दूदैव समजावे का?कृपया आता तरी आपण आमच्या सानेगुरुजी उपसा जलसिंचन योजना बोहरे, या योजनेला विनाविलंब ताबडतोब भरघोस निधी देवून आमची योजना लवकरात लवकर सुरू करावी व आम्हाला जीवनात कायमचे दुष्काळमुक्त करून साने गुरुजी उपसा जलसिंचन योजनेच्या पीडित शेतकऱ्यांना व आम्हाला दिलासा द्यावा अन्यथा साने गुरुजी उपसा जलसिंचन योजनेचे पीडित शेतकऱ्यांना आंदोलन उभारावे लागेल असे निवेदनात म्हटले आहे निवेदनावर पीडित शेतकऱ्यांच्या सह्या आहेत त्यात साने गुरुजी उपसा जलसिंचन योजनेचे चेअरमन युवराज पाटील,आसाराम धनगर, प्रकाश पाटील,शिवाजी पाटील,मधुकर पाटील दिलीप पाटील,उमाकांत साळुंखे, भिकन सिद्धपुरे,उमेश सुर्वे,दिपक पाटील, आधार चौधरी, मनोज वडार,दिनेश पाटील,मनीष पाटील रुपेश साळुंखे आदी शेतकऱ्यांनी सह्या करून निवेदन सादर केल.

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.