
पाचोरा येथे आदिवासी भिल्ल कुटुंबाच्या १५ दिवसांच्या बाळाचा मृत्यू; डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप तर डॉक्टरांनी माता पिता यांच्या विरोधात तक्रार वजा निवेदन !
पाचोरा, १७ नोव्हेंबर २०२३: पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील वृंदावन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या १५ दिवसांच्या आदिवासी भिल्ल कुटुंबाच्या बाळाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

आरोप :-
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव येथील आदिवासी भिल्ल कुटुंबातील १५ दिवसांच्या बाळ आजारी असल्याने त्याला वृंदावन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असे माता पित्यानकडून सांगण्यात आले यावेळी डॉक्टरांनी पाच मिनिटातच बाळाला जळगाव घेवून जा असे सांगितल्याने बाळाच्या आई वडिलांनी डॉक्टरांवर आरोप केला कि डॉक्टर स्टाफ यांनी योग्य वागणूक व ट्रीटमेंट केली नाही व बाळाच्या प्रेताची अवहेलना केली . व बऱ्याच वेळा नंतर नातेवाईकांच्या विनवण्या व आग्रह केल्यानंतर डॉक्टरांनी रात्री उशिराने का होईना रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास नवजात १५ दिवसीय बालकाची तपासणी करुन उपचार सुरु केले. मात्र दुपारपासून उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आलेल्या बालकावर उशिराने तपासणी व घाईघाईने उपचार करण्यात आल्यामुळे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नवजात बालकाचा मृत्यू झाला असा आरोप करण्यात आला तसेच हा प्रकार घडल्यानंतर. संबंधित आदिवासी भिल्ल कुटुंबीयांनी मृत बालकाला घेऊन पाचोरा येथील नगरपरिषदेच्या दवाखान्यात धाव घेतली होती. तसेच पाचोरा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यासाठी प्रयत्न करत होते परंतु त्यांना योग्य मदत व मार्गदर्शन मिळाले नसल्याने तसेच परिस्थितीने हतबल झालेले आदिवासी भिल्ल कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत पाचोरा शहरात रात्रभर संघर्ष करत असे कुटुंबियांकडून सांगण्यात आले . तसेच दिनांक १४ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री उशिरा पाचोरा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच आज दिनांक १७ नोव्हेंबर २०२३ शुक्रवार रोजी सकाळी मयताच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी एकलव्य संघटनेतर्फे पाचोरा पोलीस स्टेशन समोर धरणे आंदोलन करण्यात आले तर डॉक्टरांची तक्रार मंत्र्यांकडे करणार असून आमदारांच्या मध्यस्तीने धरणे आदोलनाला विराम देण्यात आला. अशा प्रकारे सदरील कुटुंबाने आरोप केल्या नंतर वृंदावन हॉस्पिटल तर्फे प्रत्यारोप करण्यात त्यात
प्रत्यारोप :-

या घटनेनंतर वृंदावन हॉस्पिटलचे संचालक डॉ. निळकंठ पाटील यांनी पाचोरा पोलीस स्टेशनला तक्रार वजा निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की मयत ११०० ग्राम वजनाचे बाळ नाशिकच्या हॉस्पिटल मधून, थंडीच्या दिवसात भडगाव पर्यंत येवढा लांब प्रवास करुन आणले व दोन दिवस घरी स्तनपान केले तसेच वृंदावन हॉस्पिटलला आल्यावर तात्काळ झटके आल्याची माहिती जाणीव पूर्वक लपवून ठेवली तसेच तात्काळ जळगाव सिविल हॉस्पिटलला उपचार घ्यायचा सल्ला दिल्यावर सुद्धा हेतू पुरुस्कृत सुमारे दोन तास पाचोरा सिविल हॉस्पिटलला वेळ घालवला. यामुळे बाळाच्या मृत्युस पालक यांची जबाबदारी निश्चित करून गुन्हा नोंदवावा व शिक्षा द्यावी.
या घटनेमुळे दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. एकीकडे आदिवासी भिल्ल कुटुंब हे डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करत आहे तर दुसरीकडे वृंदावन हॉस्पिटलचे संचालक कुटुंबावर ते हॉस्पिटलवर खोटे आरोप करून बदनामी करत असल्याचा प्रत्यारोप केला जात आहे .
तर पोलीस प्रशासन दोन्ही बाजूने निपक्ष पाती पणाने तपास करीत असल्याचे पोलीसांनकडून सांगण्यात आले .
यास जबाबदार व्यक्तिवर योग्य ते कारवाई व्हावी व यात कुठलाही राजकीय रंग येणार नाही असे दोन्ही पक्षाकडील सामन्य नागरिकांकडून बोलले जात आहे .



