खान्देश

भडगाव येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न !

भडगाव येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न !

भडगाव, जळगाव: राष्ट्रीय चर्मकार महासंघ, भडगाव तालुक्याच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शासकीय विश्रामगृह भडगाव येथे मोठ्या उत्साहात आणि मोठ्या संख्येने समाज बांधवांच्या उपस्थितीत संपन्न झाला. समाजातील हुशार विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस प्रेरणा देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे कार्याध्यक्ष समाजभूषण भानुदास विसावे होते. या प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष पांडुरंग बाविस्कर, जिल्हाध्यक्ष ईश्वरलाल अहिरे, धनराज पवार, उत्तम मोरे, डॉ. समाधान वाघ, मधुकर वाघ, सागर वाघ, नितीन तायडे, पत्रकार संजय शेवाळे, दगडू गायकवाड, गणेश अहिरे, नीळकंठ बावीस्कर, तुकाराम बावीस्कर, शांताराम बोरसे, आनंदा अहिरे, मोहित अहिरे, हेमंत अहिरे, डॉ. साहेबराव अहिरे, माजी नगरसेविका योजनाताई पाटील, सागर महाजन, संगिता रवींद्र अहिरे, कविता वाघ, हिरामण पाटोळे, प्रदीप वाघ, वसंत वाघ, विलास मोरे, सुनील मोरे, शिवाजी बाविस्कर, मुकेश मोरे, कैलास देवरे, भडगाव तालुका अध्यक्ष रवी अहिरे, सुधीर अहिरे आदींसह तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी दहावी, बारावी आणि पदवीधर अशा समाजातील ७५ गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचे कौतुक करून त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण महाजन यांनी केले, तर आभारप्रदर्शन तालुकाध्यक्ष रवी अहिरे यांनी मानले. या सोहळ्यामुळे समाजातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाप्रती अधिक आवड निर्माण होऊन त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात आली.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button