विरोधकांजवळ नरेंद्र मोदीच्या विरोधात नेता , निष्ठा आणि नीतिमत्ता ही नाही : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विरोधकांजवळ नरेंद्र मोदीच्या विरोधात नेता , निष्ठा आणि नीतिमत्ता ही नाही : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पाचोरा (प्रतिनिधी ) – जळगाव लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचार सभा पाचोरा भडगाव रोड येथे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी काँग्रेसचे राहुल गांधी शरद चंद्र पवार उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केल्या फळवणीस म्हणाले की कालच्या जळगावच्या उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये विकासाचा मुद्दा नाही समाजाचा व दलिताचा विकास नाही बेरोजगार व महागाईचा मुद्दा नाही समाजाची गरिबांची गरिबी कशी दूर होईल याचा मुद्दा नाही त्यांनी अर्ध भाषण मोदीजींना आणि महायुतीला शिव्या देण्यातच केलं अरे या नरेंद्र मोदीजींच्या समोर नेता नाही निती नाही नियत नाही अशा लोकांना काय निवडून देणार भाजपाला 4 जून नंतर बिळातुन काढून मारू अरे ,अडीच वर्षे मुख्यमंत्री होते. तेव्हा उद्धव ठाकरे बिड्यात लपले होते आणि आज बाहेर काढू म्हणता ,वाघांना हात लावण्याची हिंमत आहे. का असा टोला मुख्यमंत्री यांनी दिलाय, कधी कधी बोलताना सत्य तोंडात येत आणि ते शरद पवार बोलताना बोलून दाखवलं की या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीकरण होणार आहे. कारण त्यांना पराभव लक्षात येत आहे. आणि पवार साहेबांच्या नंतर उभाटा देखील काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे. आणि राष्ट्रवादी व उबाटा राज्यातून संपुष्टात येणार आहे.
शिवसेनेचे हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं,की ज्या दिवशी शिवसेना काँग्रेस सोबत जाईल त्या दिवशी शिवसेनेचे दुकान बंद करू आणि आता उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची युती तर केलीच पण या निवडणुकीनंतर त्यांची उंबरठा सेना काँग्रेसमध्ये विलीकरण होणार आहे आणि त्यांचे शिलेदार शरद चंद्र पवार असणार आहेत जनतेनी भारतीय जनता पार्टीला गेला दहा वर्षात भक्कम पाठिंबा दिला आता देखील तसाच पाठिंबा द्या कारण नरेंद्र मोदींना मोठ्या मताने निवडून आल्यानंतर भाजपा विकासाची रेल्वे चालवायची आहे या विकासाच्या रेल्वेला मोदीजींचा इंजन लागलेला आहे आणि या मोदींच्या इंजिनाला एकनाथ शिंदेंची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी राज ठाकरेंची मनसे रिपाई असे अनेक डबे जोडले गेलेत आणि या डब्यांमध्ये अल्पसंख्यांक ओबीसी दलित आदिवासी या सर्वांना विकासाकडे घेऊन जाण्यासाठी भाजपाचे विकास ट्रेन सुरू राहणार आहे. नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात 80 हजार कोटी लोकांना मोफत धान्य दिलं पन्नास हजार कोटी लोकांना मोफत विविध योजना दिल्या पाच लाखापर्यंत मोफत उपचार मोफत औषधी आयुष्यमान भारत ही योजना दिल्या शेतकऱ्यांना योजना दिल्या एवढेच नव्हे पन्नास हजार कोटी महिलांना बचत गटामार्फत कर्ज दिले तरुणांना व्यवसायासाठी मुद्रा लोन दिल्या असा झपाटाने विकास गेल्या दहा वर्षभरामध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली सुरू आहे आणि म्हणून पाचोरा भडगाव मतदार संघाच्या तमाम जनतेने भाजपाला मतदान करावं आणि भाजपाला विजयी करावे कारण 2026 नंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभेमध्ये महिलांना 33 टक्के विधानसभेमध्ये महिलांना 33 टक्के आणि आज या व्यासपीठावर बसलेले आहेत याच्यानंतर पन्नास टक्के महिला व्यासपीठावर असतील अशा महिलांना न्याय देण्याचं काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करीत आहेत अखंड भारत अखंड गरीब जनता ही आजही मोदीजींच्या पाठीशी आहे तरी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला विकासासाठी जास्तीत जास्त मतांनी विजयी करा असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केले व्यासपीठावरती जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन ना मंत्री शिरीष चौधरी आ मंगेश चव्हाण आ राजू भोळे मा आ दिलीप वाघ संजय गोहिलं डॉ निळकंठ पाटील आनंद खरात अमोल शिंदे मधुकर काटे डी एम पाटील नाना पाटील सुभाष मुडे रमेश वाणी अशा प्रचंड पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



