
महिलांची मोफत रक्त तपासणी शिबिर संपन्न
गहुले – ता.पाचोरा ,राजर्षी शाहू महाराज बहूउद्देशीय सेवाभावी संस्था पिंपळगाव(हरे.), वृंदावन फाउंडेशन पाचोरा माध्यमातून. महाराष्ट्र शासन महाल्याब-आणि ग्रामीण रुग्णालय पिंपळगाव हरेश्वर,ग्रामपंचायत – गहुले यांच्या सौजन्याने दि.29/11/2023 बुधवार स.9 वा. पासून शिबिर नोंदणी करण्यात आली.यात वेगवेगळ्या सहा प्रकारच्या रक्त तपासण्या करण्यात आल्या. या रक्त तपासण्या करण्यासाठी 3 ते 4 हजार रुपये खर्च येतो. माञ या शिबिराच्या माध्यमातून महिलांचीमो फत* रक्त तपासणी करण्यात आल्या. शिबीर स्थानी प्रमुख पाहुणे : डॉ. निळकंठ पाटील (अस्थीरोग तज्ञ) वृंदावन हॉस्पिटल संचालक, दशरथ महाजन(महाल्याब) प्रतिभा परदेशीं (महाल्याब)सचिन सोनवणे(एच आय व्ही एड्स समुपदेशक)ई.मान्यवर उपस्थित होते.यात
डॉ.निळकंठ पाटील यांनी महिलांना ” *हिमोग्लोबिन* व रक्तातील लोहाचे प्रमाण कसे वाढेल यासाठी लोखंडी कढई व लोखंडी तवा वापरणे चालु करा असे अवाहन केले. व लोह शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणी तो कशामुळे वाढु शकते हे अतिशय सोप्या भाषेत सांगितले.सर्व महिलांना विषय खूप आवडला.
शिबिर यशस्वी अनिल तडवी, (पोलीस पाटील) यांनी केले



