कृषी

वैशाली सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न

वैशाली सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न
गुढे (प्रतिनिधी)  गुढे येथे दि. 08/10/2023 रोजी  श्री गोपेश्वर महादेव सहकारी भाजीपाला व फळे उत्पादक खरेदी विक्री संस्था मर्यादित चा उद्घाटन सोहळा अण्णासो . एम. के. पाटील आणि शिवसेना नेत्या  वैशाली सुर्यवंशी यांच्या हस्ते संपन्न झाला. या संस्थेचे उद्देश असे आहे की संस्थेच्या मालकीच्या जमिनीवर भाजीपाला व फळझाडे यांचे लागवड करणे व उत्पादन कार्यक्रम अमलात आणणे, आपल्या संस्थेच्या अंतर्गत भाजीपाला व फळझाडे लागवडीकरिता यंत्रणा व साधन सामग्री उभी करणे, भाजीपाला व फळांची चांगल्या प्रकारे साठवणूक करणे त्यासाठी आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करणे, शीतकरणयुक्त गोदाम उभारणे तसेच यावर प्रतिबंधक औषधे, पावडर वगैरे फवारणे आदी. या उद्घाटन सोहळा प्रसंगी डॉ. उत्तमराव महाजन, उद्धवराव महाजन, भाऊराव अर्जुन माळी चेअरमन विकास सोसायटी, दिलीप देविदास पाटील, रघुनाथ हिलाल माळी, संजय सुधाकर पाटील, श्याम सर कोळगाव सह समस्त ग्रामस्थ मंडळी आणि पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button