Home पाचोरा जय जय जय श्रीराम गजरात सावद्यात रामनवमीनिमित्त काढली मिरवणूक

जय जय जय श्रीराम गजरात सावद्यात रामनवमीनिमित्त काढली मिरवणूक

जय जय जय श्रीराम गजरात सावद्यात रामनवमीनिमित्त काढली मिरवणूक

“चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमीला ‘रामनवमी’ असे म्हणतात.या दिवशी दुपारी बारा वाजता श्रीरामाचा जन्म झाला. या दिवशी मंदिरांत श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा केला जातो.”

ता.प्रतिनिधी/दिलीप चांदेलकर.

सावदा :- भारत भूमी ही नेहमीच पवित्र भूमी राहिली आहे, इतिहासानुसार येथे अनेक देवी-देवतांनी अवतार घेतला आहे.या इतिहासावर लक्ष केंद्रित केले तर जेव्हा रावणाचे अत्याचार खूप वाढले आणि लोक अस्वस्थ झाले,तेव्हा पुन्हा या अत्याचारांपासून मुक्त होण्यासाठी भारतीय भूमीवर महापुरुषाचा जन्म झाला.या महापुरुषाचे नाव भगवान राम होते.ज्यांनी रावणाच्या अत्याचारातून मुक्ती मिळवली आणि त्यावेळी लोकांचे रक्षण केले.महणून जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे त्रेतायुगात जन्मलेल्या भगवान रामाचा जन्मदिवस राम नवमी म्हणून साजरा केला गेला.शहरात पालखी द्वारे भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जय जय राम जय श्रीराम मर्यादापुरुषोत्तम श्रीरामचंद्रजी यांच्या गगनभेदी गर्जनांने परिसरात आनंदीमय वातावरण तयार झाले.तसेच संभाजी चौकात मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र जी यांच्या तैंल प्रतिमेचे शास्त्र पद्धतीने पूजन देखील करण्यात आले.तरी याच पद्धतीने शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पूजन करण्यात आले.सदरील मिरवणुकीमध्ये ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिकांसह लहान मुलांचा समावेश मोठ्या प्रमाणात होता.याप्रसंगी सावदा पोलिस ठाण्याचे एपीआय देविदास इंगोले,यांच्यासह ए.एस आय.मेहमूद शाहा,पोलीस हेड कॉ.उमेश पाटील,गोपनीय विभागाचे पो.नाईक यशवंत टाहकडे व गृहरक्षक दलाचे जवान यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.