Home पाचोरा *उन्हाळ्याची तीव्रता पाहता शाळांची वेळ सकाळी ७ ते १० व्हावी – अ.महा.उर्दू शिक्षक संघटनेची मागणी

*उन्हाळ्याची तीव्रता पाहता शाळांची वेळ सकाळी ७ ते १० व्हावी – अ.महा.उर्दू शिक्षक संघटनेची मागणी

*उन्हाळ्याची तीव्रता पाहता शाळांची वेळ सकाळी ७ ते १० व्हावी – अ.महा.उर्दू शिक्षक संघटनेची मागणी

सावदा प्रतिनिधी /दिलीप चांदेलकर.

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथील रहिवासी व अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनाचे राज्य अध्यक्ष मोहम्मद हनीफ शेख यांनी नुकतेच प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद जळगांव यांना सादर केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, उन्हाळ्याची तीव्रता बघुन वाढत असलेली उष्णता सह सध्याचे तापमान लक्षात घेऊन विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये शाळांची वेळ सकाळी ७ ते १० अशी ठेवण्यात आलेली असून सध्या पवित्र रमजान महिना सुरू असून सर्व उर्दू शाळेतील शाळकरी मुले मुलींसह शिक्षक वर्गाचे रोजे (उपवास) देखील असतात तसेच इतर माध्यमांच्या शाळांमध्ये सुद्धा लहान मुले मुलीं सदरील तापलेल्या वातावरणात येत असतात.तरी उन्हाळ्याची तीव्रता बघून विदर्भ प्रमाणे संपूर्ण जळगांव जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या वेळत बदल करून सहानुभूती पुर्वक विचार करून आदेश निर्गमित करणेबाबतची मागणी निवेदनाद्वारे त्यांनी केलेले आहे. सदर निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी जळगांव व मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. जळगांव यांना पाठवण्यात आले आहे.तरी संबंधित वरिष्ठ अधिकारी याकडे त्वरित लक्ष देऊन योग्य तो निर्णय घेतील अशी अपेक्षा विद्यार्थी व पालकांमध्ये व्यक्त केली जात आहे.