मस्कावद सिम येथील विविध कार्य.सह.सो.च्या २ उमेदवारा विरुद्ध घेतली हरकत!
सदरील दोघ उमेदवारांना अपात्र ठरवण्याकामी लेखी हरकत घेणाऱ्यांची प्राप्त हरकतीचा अवलोकन करून नियमानुसार हरकत फेटाळण्यात आली.
एम बी महाजन निवडणूक निर्णय अधिकारी रावेर
राजकीय दबावापोटी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सदरील उमेदवारा विरुद्ध दाखल हरकत संभ्रम अवस्था निर्माण करून फेटाळलेली दिसून येते.तरी याबाबत मी अपिल दाखल केली असून तीथे न्याय मिळेल असा विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.
हरकत घेणार किरण मुरलीधर फेगडे
सावदा प्रतिनिधी /दिलीप चांदेलकर.
सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या मस्कावद सिम येथील विविध विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत उमेदवार माजी जि.प सदस्य कैलास विठ्ठल सरोदे यांचे विरुद्ध मस्कावद येथील किरण मुरलीधर फेगडे व सर्जू गोविंदा होले या दोघांनी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी एम.व्ही महाजन रावेर यांच्याकडे दि.५/४/२०२२ रोजी लेखी स्वरूपात हरकत घेतलेली आहे.
सदरील घेतलेली लेखी हरकत मध्ये असे म्हटले आहे की, उमेदवार कैलास सरोदे हे थकीत कर्जदार नितीन भोगे यांस जामीनदार असून दि.१६/२/२०२२ रोजी यांना विविध कार्य.सह.सो.मसकावद सिमचे सचिव यांच्या सहीने कलम १०१ प्रमाणे नोटीस दिलेली आहे. म्हणून सदरील उमेदवार हे थकीत कर्जदाराला क्रमांक एकचे जामीनदार असून तरी दुसरे उमेदवार अरुण यशवंत पाटील हे सोसायटी खातेदार नसल्याच्या कारणाखाली निवडणूक नियमानुसार अपात्र ठरवण्यात यावे अशी लेखी मागणी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केलेली आहे.तरी याकडे सर्व मस्कावदसीम येथील नागरिकांचे लक्ष लागून आहे.