Home पाचोरा सावदा येथील माजी नगरसेविकाचे पती राहुल पाटील झाले बेपत्ता!

सावदा येथील माजी नगरसेविकाचे पती राहुल पाटील झाले बेपत्ता!

सावदा येथील माजी नगरसेविकाचे पती राहुल पाटील झाले बेपत्ता!

सावदा प्रतिनिधी /दिलीप चांदेलकर.

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे स्वामीनारायण नगरात रहिवासी व गणेश प्रोव्हिजन दुकानचे मालक आणि माजी नगरसेविका करुणा पाटील यांचे पती राहुल वसंत पाटील हे दि.७ एप्रिल २०२२ रोजी १२-३० वा. सदरील दुकान बंद करून चाबी घरातील शोकेसवर ठेवून कोणालाही काही एक न सांगता घरा बाहेर निघून गेले असता ते दि.८ एप्रिल २०२२ रोजी सकाळचे ४- वाजेपर्यंत घरी परत आल्या नसल्याची माहिती पत्नी करूणा पाटील यांनी त्यांचे सासरे रवींद्र वसंत पाटील यांना दिली असता त्यांनी मुलाचे मित्रमंडळी व नातेवाईकांची भ्रमणध्वनीद्वारे चौकशी केली असता ते कुठेही आढळून आले नाही.त्यामुळे रवींद्र वसंत पाटील यांनी थेट सावदा पोलीस स्टेशन गाठून मुलगा राहुल पाटील हरवल्या संदर्भात दि. ८ एप्रिल २०२२ रोजी खबर दिलेली आहे.

सदरील हरवलेल्या प्रौढ व्यक्तीचे वर्णन रंग गोरा, उंची ५ फूट ८ इंच्, चेहरा लांबट, केस काळे, नाक सरळ, मिशी जाड व काळी, अंगात लाल रंगाची हाफ बाईचे टी-शर्ट, काळ्या रंगाची नाईट पाईंट, पायात चामडी चप्पल परिधान केली असून अशा वर्णनाची व्यक्ती कोणाला आढळून आल्यास त्यांनी सावदा पोलीस स्टेशनात ०२५८४-२२२०४३ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आव्हान हेड कॉ.उमेश पाटील यांनी केले आहे.