Home पाचोरा अतिक्रमण काढण्याच्या मुद्द्यावरून जिल्हा परिषद समोर आमरण उपोषण करणाऱ्याने लेखी आश्वासन नंतर सोडले उपोषण.

अतिक्रमण काढण्याच्या मुद्द्यावरून जिल्हा परिषद समोर आमरण उपोषण करणाऱ्याने लेखी आश्वासन नंतर सोडले उपोषण.

अतिक्रमण काढण्याच्या मुद्द्यावरून जिल्हा परिषद समोर आमरण उपोषण करणाऱ्याने लेखी आश्वासन नंतर सोडले उपोषण..

भारत पाटील कुऱ्हाड (प्रतिनिधी) मौजे म्हसास ता.पाचोरा येथील रहिवासी संजय सिताराम पाटील यांनी दिनांक ०४/०४/२०२२ पासून जिल्हा परिषद समोर आमरण उपोषण सुरू केले होते, उपोषण कर्ता ह्यांनी दिनांक०७/३/०३/२०२२र रोजी म्हसास ग्रामपंचायतीत अरुण दामु पाटील व रविंद्र दामु पाटील ह्यांनी सार्वजनिक रस्ता व ग्रामपंचायत हद्दीत पक्के सिमेंटचे कॉलम टाकुन बांधकाम चालू केले आहे अशी तक्रार दाखल केली होती. ग्रामपंचायतीने अतिक्रमण धारकांना नोटीस बजावण्यात आली, परंतु चालू असलेले बांधकाम हे थांबविण्यात आले नाही,ऊलट मला नोटीस पाठवून तुमचेच अतिक्रमण आहे, असे उपोषणकर्ताने सांगितले, त्या विरोधात उपोषण कर्ताने मा.गटविकास अधिकारी पाचोरा व मा.मुख्यकार्यकारी अधिकारी जळगाव ह्यांच्या कडे सुद्धा तक्रार दाखल केली, त्यांची प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही, त्या कारणाने दिनांक ०४/०४/२०२२ पासून जिल्हा परिषद समोर आमरण उपोषण चालू होते,आज दिनांक ०७/०४/२०२२ रोजी मा.गटविकास अधिकारी पाचोरा व विस्तार अधिकारी ह्यांच्या आश्वासन नंतर व सरपंच व ग्रामसेवक ह्यांच्या लेखी पत्राद्वारे उपोषण कर्ताले सरबत पाजुन उपोषण सोडविण्यात आले.