Home पाचोरा तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती निमित्त आंबेडकरी उत्सवाचे पदाधिकारी सोबत बैठक संपन्न

तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती निमित्त आंबेडकरी उत्सवाचे पदाधिकारी सोबत बैठक संपन्न

भडगाव- प्रतिनिधि -(संजय शेवाळे)- आज रोजी भडगाव तहसीलदार यांच्या दालनात आयएएस अधिकारी तथा प्रभारी तहसीलदार कुमारी स्नेहा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस निरीक्षक अशोकराव उतेकर व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी लांडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती निमित्त आंबेडकरी उत्सवाचे पदाधिकारी सोबत बैठक घेण्यात आली.
बैठकीत प्रभारी तहसीलदार कु. स्नेहा भोसले ,पोलीस निरीक्षक अशोकराव उतेकर,मुख्याधिकारी लांडे साहेब यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे भडगाव तालुका अध्यक्ष तथा संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य महाराष्ट्र शासन भडगाव तथा एस.डी.खेडकर ,यासह एनसीपी चे सुरेंद्र मोरे,नितीन सोनवणे यांनी आपापले मनोगत व्यक्त केले.भडगाव च्या जयंतीच्या बाबतीत महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची या वर्षी नाचून नाहीतर वाचून जयंती साजरी करण्यात येत आहे त्यामुळे जयंती उत्सव समितीचे अभिनंदन करण्यात आले. त्याच प्रमाणे प्रशासनास पूर्ण पणे पदाधिकारी सहकार्य करतील असे आश्वासन देत प्रशासनाने उपस्थितांचे आभार मानले.या प्रसंगी तहसीलदार स्नेहा भोसले,पोलीस निरीक्षक अशोकराव उतेकर,नगर परिषदेचे मुख्याधिकारी लांडे साहेब ,रिपाइंचे आठवले गटाचे भडगाव तालुका अध्यक्ष एस. डी. खेडकर आण्णा,भडगाव जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सनी सोनवणे, लहुजी संहर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष गुरुदास भालेराव, रिपाइंचे सचिन बागुल, प्रितम सोनवणे,ncp चे सुरेंद्र मोरे,नितीन सोनवणे,तुषार शिरसाठ ,सिद्धार्थ गायकवाड,गोपनीय पोलीस स्वप्नील पाटील, चंद्रमणी बाविस्कर, निलेश सोनवणे,अक्षय सोनवणे,राहूल शिरसाठ, समाधान सोनवणे, सुशील सोनवणे,विकास सोनवणे,मयुर वानखेडे, रॉकी वाघ,स्वप्नील बैसाने,आरून जवरे,नाना सोनवणे,यांच्या सह आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.