दहा वर्षाच्या बालकाने गिळले 5 रुपयांचे नाणे; विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये थोडक्यात बचावला जीव मुलावर इंडोस्कोपी शस्त्रक्रिया करून त्याचे प्राण वाचवण्यास विघ्नहर्ता .टीमला यश

0 16

दहा वर्षाच्या बालकाने गिळले 5 रुपयांचे नाणे; विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये थोडक्यात बचावला जीव मुलावर इंडोस्कोपी शस्त्रक्रिया करून त्याचे प्राण वाचवण्यास विघ्नहर्ता .टीमला यश

पाचोरा विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बालकाच्या उपचारास हॉस्पिटल टीमला यश मिळाले वृत्त असे की जामनेर तालुक्यातील शेंदूनी येथील बालक रोहित राऊत वय ११ रा शेंदूणी यांनी खेळतां खेळतां पाच रुपयाचा डॉलर शरीराच्या जठर मध्ये अटकून पडला होता ,तर पाचोरा विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये पाच रुपयांचे नाणे गिळलेल्या दहा वर्षांच्या मुलावर तात्काळ इंडोस्कोपी शस्त्रक्रिया करून त्याचे प्राण वाचवण्यास विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना यश आले आहे. वृत्त असे की ९जुलै रोजी दुपारी ३ वाजता पाच रुपयांचे नाणे गिळलेल्या दहा वर्षांच्या मुलाचा जीव धोक्यात आला ,होता जठार नलिकेत अडकलेले नाणे काढण्यास बालकाचा जीव धोक्याचे होता अखेरचा पर्याय म्हणून त्याच्या कुटुंबातील नागरिकांनी मुलास पाचोरा विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. अपोलो हॉस्पिटल चे सुप्रसिद्ध सर्जन डॉ शरद देशमुख भूलतन्य डॉ सागर गरुड असिस्टंट माने या पथकाने अर्ध्या तासाच्या इंडोस्कोपी
शस्त्रक्रियेद्वारे मुलास जीवनदान काल दु ३ वाजता अत्यवस्थ अवस्थेत त्यास पाचोरा विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
एक्स-रे बघून तात्काळ डॉ सागर गरुड डॉ भूषण मगर डॉ शरद देशमुख यांनी इंडोस्कोपी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. डॉ सागर गरुड यांच्या मदतीने अपोलो हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध डॉ. शरद देशमुख डॉ. भूषण मगर आणि इंडोस्कोपी शस्त्रक्रिया विभागातील कर्मचारी यांच्या टीमने अर्ध्या तासाच्या अथक परिश्रमानंतर ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वी केली.

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.