म्हसास ता.पाचोरा येथे शिवजयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन.
भारत पाटील कुऱ्हाड(प्रतिनिधी) म्हसास येथे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दिनांक २१/०२/२०२२रोजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, यावेळी छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन व पुष्पहार जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रोकडे सर यांनी केले,व राष्ट्रमाता जिजाऊ प्रतीमेचे पुजन पल्लवी पाटील हिने केले, धर्मवीर संभाजीराजे प्रतीमेचे पूजन राजू राठोड यांनी केले, सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा परिषद शाळेतील, माध्यमिक विद्यालय म्हसास व डॉ जे.जी.पंडीत माध्यमिक विद्यालय लोहारा विद्यार्थ्यांनी व गावातील महिलांनी छत्रपती शिवाजी महाराज जिवन चरीत्रावर भाषणं, गाणी,लेझीम सहभाग घेतला, तरी सर्व स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती कडुन शैक्षणिक परीक्षा पॅड देण्यात आली, तसेच सदर कार्यक्रमास गावातील महिलांनी पुरुषांनी चांगला प्रतिसाद मिळाला, तरी सदर कार्यक्रमास गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रोकडे सर यांनी, माध्यमिक विद्यालय म्हसास शिक्षक वृंद व गावातील आयोजक महादेव बोरसे,गजानन पाटील ( कंडक्टर ), विक्रम पाटील ,समाधान पाटील, गजानन अशोक पाटील, ईश्वर पाटील , भारत पाटील पत्रकार, विजय पाटील, राजू पाटील, अक्षय पाटील,जिवन पाटील, ईश्वर भागवत पाटील, विनोद पाटील यांचे सहकार्य लाभले व सुत्र संचलन पल्लवी पाटील हिने केले व आभार प्रदर्शन महादेव बोरसे यांनी मानले.